आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकीचे टायर फुटल्याने अपघात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरगाव मंजू - अकोल्याहून झोडगाकडे जाणा-या दुचाकीचे समोरचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.ही घटना एप्रिल रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर पैलपाडाजवळ घडली. यामध्ये दुचाकीवर बसलेला अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, झोडगा येथील राहणारे सुनील रामराव कार्वेकर वय २५ विनोद शंकर कार्वेकर वय ३० हे आपल्या दुचाकी क्रमांक एमएम ३७ के १३९९ ने मूर्तिजापूरकडे जात असताना पैलपाडानजीक त्यांच्या दुचाकीचे समोरचे टायर फुटले.

त्यामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ते दोघेही महामार्गावर कोसळले. यामध्ये विनोदच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमी झालेल्या सुनीलची प्रकृती गंभीर असल्याची माहिती असून, त्याला अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे हे सपत्नीक देवदर्शनाकरिता शेगावकडे जात असताना त्यांनी या घटनेची माहिती बोरगाव मंजू पोलिसांना दिली. त्यानंतर जखमी सुनीलला आपला अंगरक्षक प्रमोद वाघमारे यांच्यासह अकोला येथील दवाखान्यात पाठवले. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजूचे ठाणेदार डी. के. आव्हाळे यांनी आपल्या ताफ्यासह धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला वाहतूक सुरळीत केली.