आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Accidents On The National Highway In Akola District

बसची ट्रकला धडक, 22 प्रवासी जखमी, दोन चिमुकल्यांचाही समावेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाळापूर- दारव्हा आगाराची राज्य परिवहन विभागाची दारव्हा-बुलडाणा बस ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना समोरच्या ट्रकला भिडली. यामध्ये बसमधील २२ प्रवासी जखमी झाले. त्यामध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. ही घटना सकाळी ११ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील कान्हेरी फाट्याजवळ घडली.

बस क्रमांक एम. एच. २० बी. एल १८०३ क्रमांकाची दारव्हा-बुलडाणा ही बस बुलडाणा येथे जात होती. या बसमध्ये ५५ प्रवासी होते. भरधाव असल्यामुळे या बसने एम.एच. ४० ए. के. २११ क्रमांकाच्या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. अशातच चालकाचा ओव्हरटेक करण्याचा निर्णय चुकल्यामुळे बसचालकाने समोरच्या ट्रकला धडक दिली. त्यामध्ये बसमधील २२ प्रवासी जखमी झाले. त्यामध्ये संध्या मोरे (वय २२) नागपूर, शैलेश लोंढे (वय ३३) अकोला, मोहम्मद सोहेब (वय २४) अकोला, अंबादास तान्हे (वय ५०) अकोला खदान, बेबीनंदा सोनोने (वय ४७) रा. इंदूर, कमल भारत जाधव (वय ५५) बुलडाणा, यश आशिष मोरे (वय ११ महिने) रा. नागपूर, देवराव जगताप (वय ६२) रा. शिवणी, रूपाली श्रीकृष्ण पानझाडे (वय २४) रा. पळशी बु. , पूर्वा श्रीकृष्ण पानझाडे (वय दीड) महिना, कैलास जुमळे (वय ४५) रा. खडकी, विनोद सुभाष आमले (वय ६५) रा. अकोला, जयेश सारंगधर बेलोकार (वय २३) रा. खामगाव, बाळापूर नगरपालिकेचे अभियंता अंकुश कथले, मो. अशफाक मो. हारुण मेनन, ताहेराबी नजीर, खान कुरेशी, हबीब नूर हसन शहा रा. लाखनवाडा, हसन शहा कलाम शाह, सुधाकर टिकार, अंबादास चांदणे, गौरव टोलमारे यांचा समावेश आहे. ट्रकचालक मनोहर गाडवे यांच्या तक्रारीवरून बाळापूर पोलिस ठाण्यात बसच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीडमहिन्याची मुलगी गंभीर जखमी : आईआणि वडील दोघेही मूकबधिर असलेल्या एका दाम्पत्याची दीड महिन्यांची पूर्वा पानझाडे ही मुलगी गंभीर जखमी झाली. या वेळी तिच्या छातीला मार लागल्याचे डॉक्टरांनी सांिगतले होते. तसेच तिला उलट्याही झाल्या. मुलगी रडत असल्यामुळे त्या मूकबधिर आईची घालमेल झाली.

तीन वेळा ओव्हरटेक
मलाजागा नसल्यामुळे मी उभा होताे. बस भरधाव होती. बसचा अपघात होतो की काय, असेही वाटत होते, अशी माहिती बसमधील एका प्रवाशाने दिली.
ट्रकची समोरासमोर धडक
बाशटाकळीमंगरुळपीर मार्गावरील शिवापूर फाट्यावर मातीने भरलेल्या टिप्परचा आणि विटांनी भरलेल्या मेटॅडोरचा भीषण अपघात झाला. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजता घडली. या अपघातात जीवितहानी झाली नाही. मात्र, दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. एम.एच. ०९ बी.सी. २८१२ क्रमांकाचा ट्रक माती घेऊन बाळापूरच्या दिशेने भरधाव जात होता. त्याचा चालक ट्रकला ओव्हरटेक करत असताना या वेळी समोरून बाळापूरहून बार्शिटाकळीकडे जाणाऱ्या मेटॅडोरला धडकला. या वेळी ट्रकचा चालक अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरून पळून गेला. या वेळी ट्रकचे दोन्ही चाक निखळून पडल्याने दुतर्फा वाहतूक बाधित झाली होती.

जखमींना मदत
बसचाअपघात झाल्यानंतर काही जखमींना सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. या वेळी एसटी महामंडळाचे वाहतूक निरीक्षक आर. एस. राजनकर आणि वरिष्ठ सहायक डी. पी. पाठक यांनी सर्व जखमींची विचारपूस केली आणि त्यांना तत्काळ १००० रुपयांची सानुग्राह मदत दिली.
मंगरुळपीर मार्गावरील शिवापूर फाट्यावर मातीने भरलेल्या टिप्परचा आणि विटांनी भरलेल्या मेटॅडोरचा भीषण अपघात झाला.