आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेते मोहन जोशी रंगले गाण्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- ‘कसमे वादे प्यार वफा सब..’ या सुंदर गाण्याला आपल्या खास आवाजात ज्येष्ठ सिने, नाट्य व मालिका अभिनेते मोहन जोशी गात होते, तेव्हा संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजरात साथ देत होते. प्रभात किड्स स्कूलला 3 जुलैला त्यांनी भेट दिली असता हा योग आला.
प्रभात किड्सच्या विद्यार्थ्यांनी या वेळी प्रकट मुलाखत घेऊन त्यांना बोलके केले. त्या वेळी त्यांनी सारेगामामध्ये गायलेले गीत खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव सादर केले. विद्यार्थ्यांनी विद्यार्थी जीवनात खोडकर असावं. पण, त्याला एक र्मयादा असावी. कठोर पर्शिमाला पर्याय नाही. आई-वडिलांचा आदर करावा, अशा अनेक बाबी त्यांनी हितगूज करताना सांगितल्यात.
नाटक सादर करणं अवघड असल्याने सिनेमा, सीरियल्सपेक्षा नाटक करणं मला आवडत असल्याचेही ते म्हणाले. मुलाखत घेणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये राम घोंगडे, कुणाल धोत्रे, ईशा आंबेकर, सारंगा पटोकार, पीयूष हनुमंते, कुणाल देठे, वल्लभ नारे, राजेश्वरी भिरड, दर्शन मेहरे यांचा समावेश होता.

या वेळी संचालक डॉ. गजानन नारे यांनी शाल, र्शीफळ, बुके व स्मृतिचिन्ह देऊन मोहन जोशींचा सत्कार केला. कार्यक्रमास वंदना नारे, नीरज आवंडेकर, प्रा. मधू जाधव, अशोक ढेरे, सचिन बुरघाटे यांचेसह अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कार्यकारिणीचे सदस्य, प्राचार्या कांचन पटोकार उपस्थित होत्या. संचालन सांस्कृतिक समन्वयक प्रदीप अवचार यांनी केले. कार्यक्रमासाठी नंदकिशोर डंबाळे, संजीवनी अठराळे, संजय पाटील आदींनी पुढाकार घेतला.