आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरापूरकरांचे अकोल्याशी कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अभिनेते सदाशिव अमरापुरकर यांचे अकोलेकरांशी नाते होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील निवृत्त प्रा. आनंद जातेगावकर यांचे ते व्याही होते. जातेगावकरांचा मुलगा ख्यातनाम शेफ देवव्रतचा अमरापुरकरांची मुलगी केतकी हिच्यासोबत विवाह झाल्याने अहमदनगर आणि अकोलेकरांमध्ये ऋणानुबंध निर्माण झाला. कौटुंबिक भेटीसाठी ते येत असल्यामुळे त्याचा कुठेही गवगवा होत नव्हता. त्यांना कृषी विद्यापीठाचा परिसर खूप आवडायचा. जातेगावकरांचे अकोल्यातील जठारपेठेत निवासस्थान आहे. अमरापुरकर आपले नातेवाईकच नाही, तर चांगले मित्रही होते, असे आनंद जातेगावकर यांनी सांिगतले. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबाची अपरिमित हानी झाली, असे ते म्हणाले. जातेगावकर सध्या ठाण्याला त्यांच्या मुलाकडे आहेत.
सखोल अभ्यासक निघून गेला
मरापुरकरांचानाट्यशास्त्राचा सखोल अभ्यास होता. हौशी रंगभूमीवरून व्यावसायिक आणि त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी पाय रोवले. हिंदीत ते कमालीचे लोकप्रिय झाले. ते काळाच्या पडद्याआड गेल्याबद्दल दु:ख आहे. राम जाधव,अ.भा. नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष.