आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ad. Ambedkar's Friend Against The Local Congress

अँड. आंबेडकरांच्या मैत्रीला स्थानिक काँग्रेसचा विरोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- भारिप-बमसंचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी लोकसभा निवडणुकीत आघाडी करू नये, अशी मागणी स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली. ही मागणी त्यांनी येथील स्वराज्य भवनात बुधवारी दुपारी झालेल्या बैठकीत केली. पण, या बैठकीत नेमकी कोणी ही मागणी केली, याचा खुलासा झाला नाही. या बैठकीला पक्ष निरीक्षक झिया पटेल, काँग्रेसचे शहराध्यक्ष मदन भरगड, स्वाती देशमुख, अविनाश देशमुख, रमाकांत खेतान, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, अँड. नातिकोद्दीन खतीब, राजेश भारती, नगरसेविका उषा विरक, साजीदखान पठाण, कपिल रावदेव यांची उपस्थिती होती. पक्षातील नेत्यांच्या या बैठकीत केवळ पन्नास कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्षांचा दौरा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा शुक्रवार, 7 फेब्रुवारीला अकोल्यात दौरा आहे, अशी माहिती मिळाली आहे. काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांच्या पदग्रहण सोहळ्यासाठी ते येथे येत आहेत, अशी माहिती मिळाली आहे. या दौर्‍यात लोकसभा निवडणुकीविषयी पक्षाची प्रदेश स्तरावरची भूमिका माहित पडेल, अशी चर्चा येथे सुरु होती.
हा मुद्दाच नव्हता
काँग्रेस व भारिप-बमसंचे अँड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आघाडीबाबत येथे चर्चा करण्याचा प्रश्न नाही. येथील काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी अशी मागणी केली. पण, मुळात ही बैठक फक्त काँग्रेसची लोकसभेच्या तयारीसंबंधी होती. त्यामुळे या बैठकीत सर्वच विषयांवर चर्चा झाली.’’ मदन भरगड, शहराध्यक्ष, काँग्रेस अकोला.