आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Adoption Of Improved Agricultural Pricing For Selection Vice Chancellor Dr. Dani

कृषी मूल्य निर्धारणासाठी सुधारित पद्धतीचा अवलंब करा- कुलगुरू डॉ. दाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-शेतीचे अर्थशास्त्र खर्‍या अर्थाने समजून कृषी निविष्ठांचे वाढते दर लक्षात घेता कृषी मूल्य निर्धारणाच्या सुधारित पद्धती अवलंब करावा’, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी शनिवार, 1 फेब्रुवारीला केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. हरिभाऊ उलेमाले यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या महाराष्ट्र कृषी अर्थशास्त्र संघटनेच्या रौप्य महोत्सवी संमेलनाला विद्यापीठात प्रारंभ झाला. या परिषदेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. या वेळी महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शालीग्राम वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळय़ात मंचावर ग्रेट बिटन येथील प्रगतशील शेतकरी लुईस व माजी आमदार पाशा पटेल, कृषी अर्थशास्त्र परिषद संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश महेंद्रे, डॉ. दामोदर साळे, डॉ. आर. जी. देशमुख, डॉ. डी. बी. यादव, डॉ. बी. आर. पवार, माजी कुलगुरू डॉ. बी. जी. बथकल, डॉ. एस. जे. काकडे, ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. महल्ले, पाटील, डॉ. मारावार यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी मान्यवरांनी मार्गदर्शनातून कृषी विकास व शेतकरी हिताचे निर्णय कसे घ्यावे, याविषयी मार्गदर्शन केले. परिषदेमध्ये 93 शोध निबंधक व भित्तीचित्रांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांतून 153 वैज्ञानिकांसह प्राध्यापक, विद्यार्थी या परिषदेत सहभागी झाले होते. या परिषदेच्या माध्यमातून कृषी विकास, कृषी तंत्रज्ञान व कृषी पतपुरवठा यावर सविस्तर चर्चा होऊन कृषी विकासासाठी निधी स्वरूपात मार्गदर्शन मिळणार आहे.
आज समारोप
महाराष्ट्र कृषी अर्थशास्त्र संघटनेच्या रौप्य महोत्सवी संमेलनाचा रविवारी समारोप होत आहे. या समारोपीय कार्यक्रमाला शेतकर्‍यांसह कृषी क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र कृषी अर्थशास्त्र संघटना व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.
कृषी अर्थशास्त्र संघटनेच्या रौप्य महोत्सवी संमेलनाचे शनिवारी उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी, डॉ. शालीग्राम वानखडे, प्रगतशील शेतकरी लुईस व माजी आमदार पाशा पटेल.