अकोला-जीवनात आलेल्या संकटांवर मात करून संघर्षातून जीवनाची वाटचाल झाल्यास आयुष्याचे मोल कळते. संघर्षाला सामोरे गेल्यानंतर जीवनाला नवी दिशा मिळते, असेच यश विद्यार्थिनींनी मिळवत यशोशिखर गाठावे, असे आवाहन प्रा. डॉ. विनोद खैरे यांनी केले.
र्शीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयात बी.ए. तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनींसाठी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी मार्गदर्शन करताना प्रा. खैरे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. वीणा मोहोड होत्या. या वेळी डॉ. सुलोचना मानकर, डॉ. विजया खांडेकर, रश्मी घुगे यांची उपस्थिती होती. रेणू मानकर हिने स्वागतगीत सादर केले. प्रारंभी आदिती गौड, राधिका माहुरकर, प्रिया खाडे, रेणू मानकर, सारिका सरोदे, भारती सोनटक्के, आरती कापसे, जया वांडे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी आयोजित विविध स्पर्धांचे परीक्षण प्रा. अजय शिंगाडे, प्रा. ललित भट्टी, प्रा. संजय विटे यांनी केले. डॉ. सुलोचना मानकर यांनी परीक्षेचे यशस्वी सूत्र सांगितले.
विद्यार्थिनींनी महाविद्यालयास छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली. संचालन मोनिका सिरसाट यांनी केले. कार्यक्रमाला उपप्राचार्य वाधोणे, प्रा. संध्या कांबळे, प्रा. धनर्शी पांडे, प्रा. सुपळकर, प्रा. विवेक चापके, प्रा. बी. एस. इंगळे, प्रा. सुमेध सगणे, प्रा. विटे, प्रा. आळशी, प्रा. भट्टी, प्रा. गद्रे, प्रा. शिंगाडे यांची उपस्थिती होती