आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन दिवसांचा ताप असल्यास दुर्लक्ष नको त्वरित रक्तनमुन्यांची चाचणी घ्या करून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- सध्यातापाच्या साथीने थैमान घातले आहे. तापाला गांभीर्याने घ्या, असा सल्ला देत दोन ते तीन दिवसांचा ताप अंगात असल्यास तत्काळ रक्तनमुने चाचणी करून घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
सप्टेंबर महिन्यात दूषित पाण्याने थैमान घातल्याने जिल्ह्यातील अनेक गावे बाधित झाली होती. अकोला, मूर्तिजापूर अकोट तालुक्यातील अनेक गावांत जलजन्य आजार पसरले होते. आरोग्य विभागाने ही साथ आटोक्यात आणल्यानंतर आता डेंग्यूचे थैमान रोखण्यात आरोग्य यंत्रणेच्या नाकीनऊ येत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयासह सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी िदसत आहे. खासगी दवाखानेही फुल्ल भरलेले आहेत. एकंदरीत आरोग्य यंत्रणा पूर्णपणे हलून गेली आहे. डेंग्यूने शहरी तसेच ग्रामीण भागातील जनतेला त्रासून सोडले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २०६ रुग्ण डेंग्यूच्या आजाराने बाधित झाले आहेत. यापैकी 24 जणांची एलायझा, तर 55 जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली. कोणताही ताप डेंग्यू असू शकतो, असे म्हणण्याची वेळ आज आली आहे. डासांमुळे डेंग्युसुद्धा होऊ शकतो मलेरीया. त्यामुळे डेंग्यूच्या नादात मलेरीयाला विसरू नका. उपचार घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
एकमच्छर खत्म कर सकती हैं जिंदगी : एडीसइजिप्ती या मच्छराने डेंग्यूसारखा गंभीर आजार होतो. या आजाराचे िनदान तर आहे, पण आठवडाभर उपचार घ्यावा लागतो. एडीस इजिप्ती हे मच्छर चावल्याने डेंग्यूने रुग्ण बाधित होतो. हे मच्छर चावल्याने अनेक जण मृत्यूच्या वाटेवर आहेत. त्यामुळे एक मच्छर खत्म कर सकती हैं जिंदगी असे म्हणण्याची वेळ आज अनेकांवर आलेली दिसून येत आहे.
मलेरियल टेस्ट करा
रुग्णाच्याअंगात दोन ते तीन दिवसांचा ताप असल्यास त्याची मलेरियल टेस्ट करून घ्यावी. ही टेस्ट साधी असून, यामुळे एखाद्याचा जीवही डॉक्टर वाचवू शकतात. त्यामुळे जनरल प्रॅक्टिशनरने निदान करूनच उपचार सुरू करावा, असा आग्रह आहे.'' डॉ.आरती कुलवाल, वैद्यकीयअधीक्षक, जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला.