आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोला शहरात आंदोलनांमुळे गाजला सोमवारचा दिवस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- शहरात झालेल्या वेगवेगळ्या आंदोलनांमुळे सोमवारचा दिवस चांगलाच गाजला. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी रिपाइंच्या दोन गटांची वेगवेगळी आंदोलने केली.

युवक आघाडीचा रास्ता रोको
पाच ऑगस्ट रोजी रिपाइंच्या (आठवले गट) युवक आघाडीने रेल्वेस्थानक चौकात रास्ता रोको आंदोलन केले. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी घोषणा देण्यात आल्या. आंदोलनात पश्चिम विदर्भाचे मुख्य संघटक अशोक नागदेवे, कार्याध्यक्ष सुनील अवचार, युवक आघाडीचे महानगराध्यक्ष गोपाल कदम,जे.टी.डोंगरे,ज्ञानदेव वानखेडे, सनी लोणकर, प्रकाश रंगारी, विनोद वानखेडे, निलेश वाकोडे, निलेश मोरे, आकाश इंगळे, सतिश नागदिवे, प्रेम समुद्रे, नितीन जाधव यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आंदोलनासाठी मिळाले कार्यकर्त्यांना पावणे दोन तास
रिपाइं कार्यकर्त्यांनी अकोला-परळी या उभ्या गाडी समोर आंदोलन करण्यात आले. ही गाडी दुपारी 12.30 ला येते आणि 2.15 मिनिटांनी निघते. त्यामुळे कार्यकर्त्यांना आंदोलन करण्यासाठी एक तास 45 मिनिटे वेळ मिळाला. दरम्यान, या आंदोलनाचा परिणाम काही काळ नागरिकांवर झाला होता.

पावसाळ्यामुळे शहरातील रस्ते खड्डय़ात गेले, तसेच शहरातील पथदिवे बंद आहेत. याविरोधात सोमवारी युवासेनेने महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले. या वेळी कार्यकर्त्यांनी मेणबत्ती, कंदील लावत महापालिका पदाधिकारी व प्रशासनाचा निषेध केला. भारिप व काँग्रेसच्या राज्यात शहराची परिस्थिती बिघडल्याचा आरोप युवासेनेचे सागर भारुका यांनी केला. या आंदोलनात जिल्हा समन्वयक मंगेश काळे, सुरेंद्र विसपुते यांची उपस्थिती होती. आंदोलनात सुयोग पाटील, आशीष शिरसाट, कार्तिक शिंदे, स्वप्निल देशमुख, राहुल कराळे यांचा समावेश होता. सिटी कोतवाली पोलिसांनी आंदोलन झाल्यावर आंदोलकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली.

महापौरांची भेट टाळली
महापौर ज्योत्स्ना गवई कार्यालयात असताना शहराच्या समस्येसाठी झालेल्या या आंदोलनकर्त्यांनी त्यांना भेटण्याची गरज होती. पण, आंदोलनकर्त्यांनी त्यांना न भेटता केवळ नगर सचिव वासुदेव वाघाळकर यांची भेट घेत निवेदन दिले.

कार्यकर्त्यांनी वाहने अडवली
रिपाइं युवक आघाडीचे कार्यकर्ते दुचाकींवरून रेल्वेस्थानक परिसरात दाखल झाले. आंदोलनाच्या वेळी काही वाहने चौकातून जात असतांना कार्यकर्त्यांना दिसले. कार्यकर्त्यांनी एमएच-40-एम-9539 या क्रमांकाची अकोला-परतवाडा बस आणि एमएच-30-पी-6219 या क्रमांकाचा ऑटोरिक्षा रोखला. कार्यकर्ते आक्रमक झाल्याने इतर वाहने चौकात थांबवण्यात आली. या वेळी रामदासपेठचे ठाणेदार विलास पाटील यांच्यासह चार अधिकारी आणि 40 पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते. गाड्या अडविल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास झाला.

उभ्या गाडीसमोर ‘रेल रोको’
स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी 5 ऑगस्ट रोजी रिपाइं (आठवले गट) जिल्हा आणि महानगर कार्यकारिणीतर्फे उभ्या असलेल्या अकोला-परळी गाडीसमोर रेल रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी रिपाइं कार्यकर्त्यांनी वेगळ्या विदर्भासाठी घोषणाही दिल्या. आंदोलनामध्ये जिल्हाध्यक्ष डी. गोपनारायण, महानगराध्यक्ष गजानन कांबळे, युवराज भागवत, मनोज इंगळे, सचिन गवई, बबलू वाकोडे, अमित सोनोने, मनोहर खंडारे, अजय रमेश इंगळे, विद्यानंद क्षीरसागर, उषा जंजाळ, वंदना वासनिक, माया घनबहाद्दूर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.