आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agricultural University Laurels, Latest News In Divay Marathi,

कृषी शिक्षा सन्मान पुरस्काराने कृषी विद्यापीठाचा गौरव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संशोधनपर उपलब्धीची नोंद घेत महिंद्रा समृद्धी इंडिया अँग्री अवॉर्ड्ससाठी विद्यापीठाची राष्ट्रीय पातळीवर निवड होऊन मानांकित कृषी शिक्षा सन्मान पुरस्कार देऊन गौरवले आहे.
कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांच्या मार्गदर्शनात कृषी विद्यापीठाने आपली शैक्षणिक, संशोधनपर व विस्तार कार्यातील घोडदौड अधिक प्रभावी केली असून, शिक्षण क्षेत्रात नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेद्वारे घेण्यात येणार्‍या कृषी संशोधक पात्रता परीक्षेत भारतातून द्वितीय स्थान प्राप्त करत 35 विद्यार्थी जेआरएफ परीक्षेत पात्र झाले आहेत. विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनाद्वारे नामांकन केलेल्या विदर्भातील 5 शेतकर्‍यांना महाराष्ट्र शासनाच्या दूरदर्शन केंद्राद्वारे सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. महिंद्रा अँड महिंद्रा फार्म इक्विपमेंट्स सेंटर या ट्रॅक्टर निर्माते आणि ट्रॅक्टर निर्माता कंपनीच्या महिंद्रा समृद्धी केंद्राद्वारे संशोधन क्षेत्रातील अद्वितीय कामगिरीबद्दल कृषी शिक्षा सन्मान पुरस्कार विद्यापीठाला प्रदान केला आहे. केंद्रीय कृषी सचिव आशीष बहुगुणा यांच्या नेतृत्वातील तज्ज्ञ समितीद्वारे विद्यापीठाच्या पीकेव्ही मिनी दाल मिल आणि हळदीपासून 12 तासांत पावडर बनवण्याच्या संयत्रनिर्मितीसाठी राष्ट्रीय पातळीवरील सन्मानासाठी निवड केली. नवी दिल्ली येथील हॉटेल अशोका येथे झालेल्या सन्मान सोहळ्यात कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी व संशोधन अभियंता प्रा. प्रदीप बोरकर यांनी केंद्रीय कृषी व अन्नप्रक्रिया उद्योग राज्यमंत्री तारिक अन्वर यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी केंद्रीय कृषी सचिव आशीष बहुगुणा, ऑटोमोटिव्ह अँड फार्म इक्विपमेंट सेक्टरचे अध्यक्ष डॉ. पवन गोयनका आदी उपस्थित होते.