आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्पन्नाच्या हव्यासापोटी जमिनीचे आरोग्य बिघडतेय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- कोणत्या पिकाला किती प्रमाणात खते द्यावीत, यासंदर्भात कृषी विद्यापीठांनी शिफारशी केल्या आहेत. तरीही अधिक उत्पनाच्या हव्यासापोटी अनेक शेतकर्‍यांचा भरमसाट रायायनिक खते वापरण्याकडे कल वाढत आहे, तर दिवसेंदिवस दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे शेतजमिनीचे आरोग्य धोक्यात आले आहे.

विदर्भातील जमिनीतील नायट्रोजनचे प्रमाण 95 ते 100 टक्केआणि फॉस्फरसचे प्रमाण 70 ते 90 टक्क्यांनी कमी झाले आहे, तर मोठय़ा प्रमाणात गंधकाचे प्रमाणही कमी होत असल्यामुळे जमिनीची सुपीकता दिवसेंदिवस कमी होत आहे. शेतकरी पाहिजे त्या प्रमाणात जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ टाकत नसल्यामुळे गंधकाची कमतरता निर्माण झाली आहे. जमिनीच्या सुपीकतेसाठी ही धोक्याची घंटा समजली जाते. त्यामुळे दज्रेदार सेंद्रिय खत व रासायनिक खताची योग्य मात्रा वापरून हे प्रमाण कमी करणे गरजेचे आहे, असा निष्कर्ष मृदू संधारण विभागाने काढला आहे.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत जमीन आरोग्य पत्रिका योजनेत मृद संधारण विभागाच्या वतीने मातीतील पिकासाठी उपयुक्त सूक्ष्म अन्नद्रव्य तपासणी मोहीम राबवण्यात आली. यामध्ये जमिनीतील नमुने तपासले होते. गंधक, जस्त, बोरॉनचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले. त्याचा परिणाम पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नसल्याने जमिनी क्षारयुक्त होत आहेत. सध्या क्षाराचे प्रमाण कमी करण्यासाठी शेतातून चर क ाढणे हा उपाय आहे. पण पाऊस, क्षारयुक्त जमिनीचे शेतीसाठी दिले जाणारे पाणी यामुळे सुपीकता वाढवणे अडचणीचे ठरत आहे.