आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agriculture News In Marathi, Divisional Commissioner, Divya Marathi

बियाण्यांची उगवणशक्ती तपासूनच पेरणी करावी, विभागीय आयुक्त बनसोड यांचे आवाहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अमरावती विभागातील पर्जन्याधारित शेती आणि गेल्या दोन- तीन वर्षांतील बेभरवशाचा पाऊस त्यातील खंड, अवेळी झालेला पाऊस आणि अतिवृष्टी याचा विचार करता, या भागातील सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकांच्या अपेक्षित उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याने शेतकरी मोठय़ा प्रमाणात अडचणीत येतात. यासाठी शेतकर्‍यांनी स्वत:कडील बियाण्याची उगवण शक्ती कृषी अधिकार्‍यांकडून तपासूनच पेरणी करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डी. आर. बनसोड यांनी केले.

येथील कृषी महाविद्यालयाच्या डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात कृषी विभाग व कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित अमरावती विभागीय खरीप हंगाम पूर्व कार्यशाळेत विभागीय आयुक्त बोलत होते. याप्रसंगी कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी, जिल्हाधिकारी अरुण शिंदे, नागपूरच्या केंद्रीय कापूस अनुसंधान संस्थेचे संचालक डॉ. केशव क्रांती, डॉ. व्ही. के. माहोरकर, डॉ. व्ही. एम. भाले, अशोक लोखंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक अशोक लोखंडे यांनी केले. माहिती शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवा : कृषी विद्यापीठाचे काम संशोधनाचे आहे आणि योजना शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कृषी विभागाची असल्याने अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांपर्यत पोहोचून त्यांना योजनांची माहिती द्यावी. शेतकर्‍यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवंलब करावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी केले.

बीबीएफ तंत्रज्ञान मोहीम पुस्तिकेचे प्रकाशन
अमरावती विभागातील शेतकर्‍यांसाठी क्रांतिकारी बीबीएफ तंत्रज्ञान मोहीम पुस्तिकेचे प्रकाशन विभागीय आयुक्त डी. आर. बनसोड यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यशाळेला उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांनी आभार मानले.

बांधावर बियाणे उपलब्ध करा
शेतकर्‍यांना या वर्षीसुद्धा बी-बियाणे व खते उपलब्ध करून दिले आहेत. खते बांधावर पोहोचवण्याची मोहीम कृषी विभागाने हाती घ्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डी. आर. बनसोड यांनी केले.