आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agriculture News In Marathi, Potatos Production, Contract Farming, Akola

चिखलीत बटाट्याचे विक्रमी उत्पादन,करार पद्धतीने केली होती शेती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिखली - शोधले तर काहीही मिळते, फक्त शोधण्याची उमेद असणे आवश्यक आहे. अस्मानी संकटांना न घाबरता शेतकर्‍यांनी स्वत:वर विश्वास ठेवून शेतीत विविधांगी प्रयोग केले, तर मातीतूनही सोने उगवू शक ते याचा प्रत्यय पारंपरिक शेतीला फाटा देत करार पद्धतीने शेती करणार्‍या चिखलीनजीकच्या सावत्रा येथील सुभाष प्रल्हाद निकस यांनी आणून दिला आहे. त्यांनी एक एकर अकरा गुंठे शेतीतून तब्बल 230 क्विंटल बटाट्याचे विक्रमी उत्पादन काढले.


सुभाष निकस हे सावत्रा येथे आधुनिक पध्दतीने शेती करतात. त्यांनी नोव्हेंबर महिन्याच्या 27 तारखेस बटाट्याचे बियाणे सिद्धीविनायक ग्रुप राजगुरू पुणे यांच्या माध्यमातून पंजाब प्रांतातून खरेदी केले. ज्योती या वाणाच्या बटाट्याची एक एकर 11 गुंठे क्षेत्रावर सरी काढून दहा क्विंटल 50 किलो इतकी लागवड केली. 2150 रुपये प्रती क्विंटल प्रमाणे बियाणे खरेदी केले. त्यानंतर आधुनिक पध्दतीने तज्ज्ञाच्या सल्लयाने मशागत करून एक एकर अकरा गुंठे शेतीतून तब्बल 230 क्विंटल बटाट्याचे विक्रमी उत्पादन काढले. आज 25 मार्च रोजी महाबीजचे संचालक वल्लभराव देशमुख व हरिभाऊ येवले यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या या प्रयोगाचा आदर्श जिल्ह्यातील इतर शेतकर्‍यांनी घेण्याची गरज आहे असे प्रतिपादन यावेळी संचालक वल्लभराव देशमुख यांनी केले आहे.


नव्या तंत्राने उत्पन्न वाढले
बटाटा काढण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. आम्ही बटाटा काढण्यासाठी रेझर पद्धतीचा उपयोग केला आहे. त्यामुळे आम्हाला उत्पन्न जास्त झाले व नुकसान कमी झाले. त्यामुळे शेतकर्‍यांनी आधुनिक औषधी, वाण, आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती करावी. ’’ सुभाष निकम, प्रयोगशील शेतकरी