आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • (AIDS) free India Campain Issue At Akola, Divya Marathi

औरंगाबाद येथून कर्मभूमी ते जन्मभूमी मोटारसायकल अभियान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मूर्तिजापूर तालुक्यातील समशेरपूर येथील मूळ रहिवासी व औरंगाबाद येथील स्वरज्ञान बहुउद्देशीय संगीत अकादमीचा संचालक असलेल्या आदेश महादेव आटोटे या तरुणाने एचआयव्ही (एड्स) मुक्त भारत अभियानाची सुरुवात 20 मेपासून औरंगाबाद येथून केली. अकोला येथे सोमवारी आल्यानंतर त्याने ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. या अभियानांतर्गत गावोगाव तरुणांना एचआयव्हीविषयी जनजागृतीपर प्रबोधनाचे कार्य तो करत आहे. त्यात तरुण, देहविक्री करणार्‍या महिला व तृतीयपंथीयांनाही प्रबोधनाचे धडे तो देत आहे.

या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात त्याने औरंगाबादनंतर जालना, देऊळगावराजा, चिखली, बुलडाणा, खामगाव, शेगाव येथे भेट देऊन एड्स आजाराविषयी काय काळजी घ्यावी, याविषयी जनजागृती केली. सोमवारी अकोल्यात विविध प्रसारमाध्यमांना भेटी दिल्या. अकोला जिल्हय़ात आणखी तीन दिवस प्रचार आणि जनजागृती करणार आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्याचा समारोप 1 जूनला मूर्तिजापूर येथे होणार आहे. त्यानंतर 3 जूनला पुन्हा दुसरा टप्पा महाराष्ट्रभर सुरू होईल. अभियानाच्या पहिल्या टप्प्यात तरुणाईचा कुठे चांगला प्रतिसाद मिळाला, तर कुठे तरुणाईने टिंगलटवाळी केली, असे सांगत आदेश आटोटे म्हणाला की, मी संगीत विषयात पदवीधर आहे. मात्र, एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्याच्या बालगृहातील एचआयव्हीबाधित मुलांचे जगणे पाहून माझे मन हळहळले आणि एचआयव्हीबाधितांसाठी कार्य करण्याचे ठरवले.