आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग्य मोबदला किंवा हवी पर्यायी जागा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शिवणी विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणासाठी कृषी विद्यापीठाच्या जमिनीचा प्रश्न निकाली काढण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात केली. कृषी विद्यापीठाच्या जमिनीचा प्रश्न निकाली लागला, तरी वादग्रस्त जमिनीचा शिवणी विमानतळाच्या ‘टेकऑफ’साठी ‘ब्रेक’ कायम आहे. या जमीन प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे मधुसूदन नंद यांनी त्या जमीन प्रकरणात योग्य मोबदला किंवा पर्यायी जागा मिळाल्यावरच मध्यस्थी करण्याची भूमिका घेतली.

दरम्यान या प्रकल्पासाठी लागणार्‍या 25.06 हेक्टर खासगी जमिनींपैकी एक जमीनधारक मधुसूदन नंद यांनी खंडपीठात याचिका दाखल केली असून, जमिनीवर तिसर्‍या पक्षाचे हक्क निर्माण करू नये, असे अंतरिम आदेश न्यायालयाने दिले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यावर ‘दिव्य मराठी’ने मधुसूदन नंद यांची भूमिका जाणून घेतली. शिवणी विमानतळाचे विस्तारीकरण व्हावे, याला दुमत नाही. योग्य मोबदला किंवा त्याच परिसरात पर्यायी जागा मिळाल्यावरच याचिका मागे घेऊ, असे मधुसूदन नंद यांनी सांगितले.

तडजोडीतुन प्रकरण मिटवू
शिवणी विमानतळ धावपट्टीच्या विस्तारीकरणासाठी गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. कृषी विद्यापीठाच्या जमिनीचा प्रश्न निकाली निघाल्यावर मधुसूदन नंद यांना योग्य सन्मान देऊन तडजोडीने प्रo्न निकाली काढण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू.’’ गोपीकिशन बाजोरिया, आमदार.