आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विहिरीत पडलेल्या दोन काळविटांना मिळाले जीवदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- येथून जवळच असलेल्या भौरद येथील एका शेतातील विहिरीत रविवार, 19 जानेवारीला पडलेल्या दोन काळविटांना येथील अजिंक्य अँडव्हेंचर ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी जीवदान दिले. भौरद येथे साठे यांच्या शेतातील कठडा नसलेल्या 35 फूट खोल विहिरीत दुपारी साडेतीन वाजता दोन नर काळवीट पडल्याचे सर्पमित्र गोलू पाटील यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ही माहिती उपवनसंरक्षक विठ्ठल धोकटे यांना दिली. विठ्ठल धोकटे यांनी काळविटांना विहिरीतून बाहेर काढण्यासाठी अजिंक्य अँडव्हेंचर ग्रुपला पाचारण केले.

शहराजवळील कुरणक्षेत्राचा विचार नाही
ज्या गावांमध्ये संयुक्त वनव्यवस्थापन समिती किंवा इको डेव्हलपमेंट कमिटी स्थापन झाली आहे, तेथील विहिरींना कठडे घालावे, असे परिपत्रक शासनाने काढले आहे. वन्यजीव व मानवी संघर्ष टाळण्यासाठी शासनाने हे पाऊल उचलले आहे. मात्र, शहरांजवळील कुरणक्षेत्रातील वन्यप्राण्यांना शेतातील कठडे नसलेल्या विहिरी धोकादायक ठरू शकतात, याचा विचारच करण्यात आलेला नाही. यावर उपाययोजना करावी, अशी मागणी वन्यजीवप्रेमींनी केली आहे.