आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला आकाशवाणी आली ‘तारुण्यात’! आज २४ वा वर्धापन दिन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - १०२.४मेगा हर्टसवर आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे, ही उद्घोषणा अकोला जिल्ह्यातील श्रोत्यांच्या कानी सर्वप्रथम मे १९९२ रोजी कानी पडली. बघता बघता आकाशवाणी आज २३ वर्षांची झाली. अत्याधुनिक संगणकीय तंत्रप्रणालीचा वापर करून नावीन्याचा ध्यास घेत आकाशवाणी कक्षेतील श्रोत्यांच्या अपेक्षा, आवडी निवडी जाणून घेऊनदर्जेदार कार्यक्रम सादर करून आकाशवाणी अकोला केंद्र श्रोत्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहे.

अकोला आकाशवाणी पुढील वर्षी २४ वर्षे पूर्ण करून रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत आहे. त्या अनुषंगाने बोला काय म्हणता?, प्रश्न तुमचे उत्तर आमचे, सूरसंवाद यांसारख्या फोन इन कार्यक्रमांसह लाेकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित समस्या, योजना यांची माहिती पोहोचवण्यासाठी इतर दैनंदिन कार्यक्रमातही श्रोत्यांचा जास्तीत जास्त सहभाग वाढवण्याचे नियोजन आतापासूनच केले आहे. बहुतांश कार्यक्रमांची आखणी आणि सादरीकरण श्रोत्यांच्या बोलीभाषेवर आधारित करण्यावर भर दिला जाणार आहे. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रम करण्यात येणार आहेत, अशी माहिती अकोला आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रमप्रमुख एकनाथ नाडगे यांन केंद्राच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

नाडगे यांनी सांगितले की, अकोला केंद्रावरून सध्या दिवसातून सोळा तास विविध कार्यक्रमांचे प्रसारण केले जाते. त्यात ६८ टक्के संगीतप्रधान, तर ३२ टक्के इतर माहितीपर कार्यक्रमांचा समावेश आहे. हल्ली श्रोत्यांकडून चित्रपट संगीतविषयक कार्यक्रमांना मागणी वाढली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अलीकडेच ‘गाता रहे मेरा दिल’ हा कार्यक्रम सुरू केला आहे. श्रोत्यांच्या पत्रातून मिळणारी पोच याची साक्ष देते, असेही ते म्हणाले.

हिंदी युवावाणीचा पहिला प्रयोग
महाराष्ट्रातीलबहुतांश आकाशवाणी केंद्रांवरून युवकांसाठी युवावाणी हा कार्यक्रम मराठीतून सादर केला जातो. परंतु, अकोला आकाशवाणीने शहारासह जिल्ह्यातील हिंदी भाषिक समाजाची लोकसंख्या लक्षात घेऊन श्रोत्यांच्या मागणीनुसार आठवड्यातून दोन दिवस हिंदी युवावाणी स्त्री सखी हा महिलांसाठी कार्यक्रम मराठीसह हिंदीतून सादर केला जात आहे.
बातम्या आणखी आहेत...