आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

19 व्यापार्‍यांकडून मनपाने केला दोन लाखांचा दंड वसूल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - स्थानिक संस्था कर (एलबीटी) नोंदणीशिवाय मनपा क्षेत्रात व्यवसाय करणार्‍या 15 व्यापार्‍यांची आज एलबीटी विभागात सुनावणी झाली. याशिवाय विविध कारणांमुळे 19 व्यापार्‍यांकडून 6 डिसेंबरपर्यंत दोन लाखांचा दंड एलबीटी विभागाने वसूल केला आहे.
एलबीटी नोंदणीशिवाय मनपा क्षेत्रात व्यवसाय करणार्‍या 60 व्यापार्‍यांना मनपाच्या एलबीटी विभागाकडून नोटीस बजावली आहे. या व्यापार्‍यांची 5 डिसेंबरपासून एलबीटी विभागात सुनावणी सुरू आहे. दोषी व्यापार्‍यांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून वसुली करण्यात येत आहे. सप्टेंबरपासून महापालिका क्षेत्रात एलबीटी लागू झाला आहे. मनपा क्षेत्रात व्यवसाय करणार्‍या व्यापार्‍याला एलबीटीमध्ये नोंदणी गरजेची आहे. नोंदणी न करता व्यवसाय करणार्‍या व्यापार्‍यांवर मनपा अधिनियम कलम 152 मधील तरतुदीनुसार कारवाईचे अधिकार मनपाला आहेत.

व्यापार्‍यांनी सहकार्य करावे
एलबीटी नोंदणीशिवाय शहरात व्यापार्‍यांना व्यवसाय करता येत नाही. तरी शहरात काही व्यापारी नोंदणीशिवाय व्यवसाय करीत असल्याचे आढळून आले आहे. व्यापार्‍यांनी नोंदणी करूनच शहरात व्यवसाय करावा.’’ कैलास पुंडे, प्रमुख, एलबीटी विभाग