आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola AMC State Government Sanction 15 Crore For Road

रस्त्यांचा होणार विकास; 17 रस्त्यांसाठी 15 कोटी, प्रमुख रस्त्यांची होणार दुरुस्ती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या शहरातील रस्त्यांसाठी राज्य शासनाकडून 15 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून शहरातील प्रमुख 17 रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येईल. त्यामुळे आगामी काळात शहरातील रस्त्यांचा कायापालट होणार आहे.
या वर्षी अकोला शहरासह जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली. शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी अतिरिक्त निधी देण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार राज्य शासनाकडून अकोला महापालिकेला 15 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. या निधीच्या माध्यमातून शहरातील दयनीय अवस्था झालेल्या 17 प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. महापालिकेकडून या रस्त्यांची निवड करण्यात आली असून, त्यावर खर्च करण्यात येणार्‍या निधीचेदेखील नियोजन करण्यात आले आहे. आता या रस्त्यांच्या कामाची निविदा काढून लवकरच काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या अधिकार्‍यांनी दिली.
काँक्रिटीकरणासाठी जोर
शहरात आठ वर्षांपूर्वी 16 कोटींच्या निधीतून 17 रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले होते. ते रस्ते आजही चांगल्या स्थितीत आहेत. त्यामुळे यादीतील 17 रस्त्यांचे डांबरीकरणाऐवजी काँक्रिटीकरण करण्याची मागणी होत आहे.
टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट चौक - 1 कोटी
टिळक रोड ते मोहता मिल -90 लाख
सुधीर कॉलनी ते मुखर्जी बंगला- 60 लाख
एसपी ऑफिस ते मनपा शाळा -22 लाख
रुंगठा पेट्रोलपंप ते देशपांडेंचे घर - 60 लाख
रस्त्याच्या निधीतून डांबरीकरण करण्याऐवजी त्याचे काँक्रिटीकरण केल्यास रस्त्याचा प्रश्न सुटेल. काँक्रिटीकरण केलेले रस्ते मजबूत व टिकाऊ होतील.’’
हरीश आलिमचंदानी, विरोधी पक्षनेते, महापालिका, अकोला.