आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोल्याच्या अधिका-यांचे राज्यातील दुष्काळग्रस्तांना 9 लाखांची मदत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - मराठवाड्यासह राज्यातील दुष्काळग्रस्तांना अकोला जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचा-यांनी एक दिवसाचे वेतन देऊन मदत केली आहे. प्रशासनाने हा 9 लाख रुपयांचा निधी उभा केला आहे. याशिवाय जिल्हा परिषद व महापालिकेकडूनही मदत करण्यात आली आहे.


अकोला जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचा-यांनी वेतन दिले आहे. यातून सुमारे 8 लाख 75 हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. पाण्याअभावी मराठवाड्यात लोक गावे सोडून इतरत्र स्थलांतर करत आहेत. ही अत्यंत भीषण परिस्थिती आहे. यामुळे दुष्काळग्रस्तांसाठी राज्यभरातून मदत येत आहे. दोन महिन्यांपूर्वीच ही मदत देण्यात आली असल्याचे अकोल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी सांगितले.