आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला हवे १० स्मार्ट सिटीजमध्ये ; स्थानिक जनतेची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - राज्यातील १० स्मार्ट सिटीजमध्ये विदर्भातील नागपूर, अमरावती शहरे असतील असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. यामध्ये अकोला शहर का नाही, असा प्रश्न येथील जाणकारांकडून उपस्थित केला जात आहे. विकासाच्या बाबत माघारलेल्या अकोल्याला स्मार्ट सिटीजच्या यादीत समाविष्ट करावे, अशी मागणी होऊ लागली आहे. येथील लोकप्रतिनिधींनी हा विषय लावून धरण्याची गरज आहे.
नवी मुंबईतील नैना शहरापासून राज्याच्या स्मार्ट सिटी संकल्पनेला सुरुवात होणार आहे. तुलनेने नागपूर, अमरावतीचा चांगला विकास झाला आहे. आता स्मार्ट सिटीजमध्ये त्यांना स्थान देऊन अकोलासारख्या शहरावर अन्याय होईल, असेही बोलले जात आहे. याबाबत आवाज उठू लागला आहे. अकोल्याला ऐतिहासिक वारसा आहे. अकोला शहर आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान राज्याशी व्यापाराने जोडलेले आहे.
रेल्वेच्या मुख्य मार्गावर तसेच राष्ट्रीय महामार्गावर असल्याने दळणवळणाचा प्रश्न नाही. विमानतळ येथे आहे. चिखलगावजवळ लवकरच कुशल कामगार योजनेंतर्गत मुक्त विद्यापीठाचे युवतींसाठी केंद्र सुरू होणार आहे. पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यास अकोल्याला देखणे स्वरूप प्राप्त होणे सहज शक्य असल्याचे मत व्यक्त होत आहे. येथून शेगाव, लोणारचे जगविख्यात सरोवर जवळ आहे. अन्य दृष्ट्याही अकोला शहराचे महत्त्व नाकारण्यासारखे नाही. देशातील राज्यातील सिटीजमध्येही अकोल्याचा समावेश नाही, याबाबत येथील अभ्यासकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. या भागात स्मार्ट सिटी उभी राहिल्यास कायापालट व्हायला वेळ लागणार नाही, असेही आतापासून बोलले जात आहे.

दबाव वाढवावा लागेल

^अकोला शहरालगत स्मार्ट सिटी व्हावी, यासाठी दबाव वाढवावा लागेल. या भागाच्या विकासाला चालना देण्याची गरज आहे. १९८० मध्ये अकोला नगर परिषद राज्यातील सर्वोत्तम नगर परिषद होती. '' डॉ.संजय खडक्कार, माजीसदस्य, विदर्भ वैधानिक विकास मंडळ