आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यातील युवकाची मराठी चित्रपटात भरारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - हलाखीच्या परस्थिितीवर मात करून लहान उमरी परिसरातील २३ वर्षीय योगेश प्रल्हाद गवारे या युवकाने आपल्या अभिनयाने पश्चिम महाराष्ट्राचे अधिराज्य असलेल्या मराठी चित्रपटसृष्टीत अवघ्या दोन वर्षांत ठसा उमटवला. त्याने केवळ अकोल्याचेच नाही तर विदर्भाचेदेखील नावलौिकक केले आहे. आगामी काही मराठी

चित्रपटात योगेशला दिग्गज कलावंतांसोबत अभिनय करण्याची संधी मिळाली आहे.
वडील प्रल्हादराव गवारे हे शेतमजुरी करून कुटुंबाचा गाढा हाकतात. त्याला केवळ इयत्ता १२ वी पर्यंतचे शिक्षण घेता आले. खंडारे काका यांच्या ओळखीने जिल्हा परिषदेच्या जनजागृती अभियानातील पथनाट्यात अभिनयाची संधी मिळाली. त्यानंतर सकाळी वर्तमानपत्राचे वाटप तर कधी दूध वक्रिीचा व्यवसाय त्याने केला. तर दुसरीकडे पथनाट्य करताना अभिनयातील चुका सुधारण्यासाठी मार्गदर्शकाची कमी त्याला जाणवली. ही कमी येथील संदीप जोशी यांच्याकडे पूर्ण झाली. जोशी यांच्याकडे अभिनयाचे धडे घेण्यासाठी त्याने ऑटोरिक्षादेखील चालवला. अभिनयाचे धडे घेत असताना डेबू चित्रपटासाठी सहायक भूिमकेसाठी दिग्दर्शकांना काही युवकांची आवश्यकता होती. यात योगेशला संधी मिळाली. यानिमित्ताने तुकाराम बिरकड यांच्यासोबत त्याचा संपर्क वाढला. येथून काही मराठी चित्रपटात त्याला अभिनयाच्या संधी मिळत गेल्यात. अभिनयाची कास धरून योगेशने यश संपादन केले आहे.

आगामी चित्रपट : लहान-मोठ्या भूिमकेनंतर योगेशला दिग्गज अभिनेत्यांसोबत मुख्य भूमिकादेखील मिळाल्या आहेत. यामध्ये बारागाव एक भानगड, झरी, स्पर्श, नागपूर अधिवेशन, समांतर, आला थंडीचा महिना, शकुंतला एक्स्प्रेस या चित्रपटांमध्ये दिग्गज कलावंतांसोबत अभिनय करणार आहे.
योग्य मार्गदर्शन मिळाले
डेबूनंतर अनेक संधी मिळाल्या. तर महानायक वसंतराव नाईक यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात त्यांच्या तरुण मित्राच्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी चित्रपटात काही मुख्य भूमिका केल्या . ''
योगेश गवारे, अभिनेता
या चित्रपटात केला अभिनय : डेबू, महानायक वसंतराव नाईक, रंगा पतंगा या मराठी चित्रपटांसोबतच पॉवर या हिंदी चित्रपटातदेखील त्याने सहायक भूिमकेत अभिनयाच्या संधी योगेशला मिळाल्या आहेत.