आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धरण तुडुंब; पाणी मात्र अकोला शहरात मिळतेय पाच दिवसाआड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शहराला पाणीपुरवठा करणार्‍या महान धरणामध्ये 81 टक्के जलसाठा आहे. मात्र, जलकुंभांची संख्या कमी असल्यामुळे अकोलेकरांना पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.


शहराला नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेचा जलप्रदाय विभाग प्रयत्न करणार का? असा प्रश्‍न नागरिकांकडून होत आहे. मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अकोला जिल्ह्यातील महान प्रकल्पात प्रचंड वाढ झाली आहे. शहरात 13 जलकुंभ आहेत. यामध्ये जुने शहरात तीन, पूर्व झोनमध्ये तीन, उत्तर झोनमध्ये एक, दक्षिण झोनमध्ये तीन आणि मध्य झोनमध्ये तीन असे जलकुंभ आहेत.


नियमित पाणी वितरणासाठी प्रयत्न
अकोला शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासन अनुकूल आहे. त्यासाठी प्रयत्न करणार आहोत. याबाबत पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा करण्यात येणार आहे. शहराला दररोज पाणीपुरवठा लवकरच होणार आहे.’’ दीपक चौधरी, आयुक्त मनपा अकोला.

दिवसाआड पाणी देण्याचा प्रयत्न
शहरातील जलवाहिनीच्या नवीन नकाशाचे काम सुरू आहे. जलवाहिनीमध्ये कुठे अडथळा (ब्लॉकेज) आहे. जलवाहिनी गळकी आहे. दोन ते तीन महिन्यांत त्याचे काम पूर्ण होईल, त्यानंतर एक दिवसाआड शहराला पाणीपुरवठा करण्यात येईल.’’ - अँड. प्रकाश आंबेडकर, राष्ट्रीय अध्यक्ष भारिप बमसं.


मनसेतर्फे पाण्यासाठी निवेदन
शहरात पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा करण्यासाठी मनसेतर्फे आयुक्तांना निवेदन देण्यात आले. चार दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याचा मुबलक साठा आहे. पण, त्याचे योग्य नियोजन होत नसल्यामुळे पाणी मिळत नाही. पाण्याचा नियमित पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.


डीपीडीसीतून 50 लाख मंजूर
जिल्हा नियोजन समिती (डीपीडीसीतून) महान प्रकल्पासाठी 50 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यासाठी महापालिकेला 50 टक्के हिस्सा द्यायचा आहे. मात्र, महापालिकेची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची आहे.