आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोलेकरांच्या नशिबी निराशा; अकोला शहरासंदर्भात अनेक प्रश्न प्रलंबितच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- मुंबईत पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनातही अकोलेकरांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडली. अकोला शहरासंदर्भात अनेक प्रश्न रेंगाळत पडून आहेत. शिवणी विमानतळाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांच्या आश्वासना व्यतिरिक्त अकोल्याला कुठलाही लाभ या अधिवेशनातून झाला नाही.

विधानसभा व विधान परिषदेतील नऊ सदस्य जिल्ह्याला लाभले आहेत. वर्षात होणार्‍या तिन्ही अधिवेशनात चर्चा होऊन तोडगा निघण्यासाठी जिल्ह्यातील आमदार अनेक प्रश्न विधिमंडळात पाठवत असतात. त्यापैकी काही प्रश्नांची तारांकित, तर काहींची अतारांकित म्हणून निवड होते.निवडक प्रश्नांवरच सभागृहात प्रत्यक्ष चर्चा होते. जिल्ह्यातील आमदारांनी नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात अकोल्यासंदर्भात शिवणी विमानतळ, हद्दवाढ, एकात्मिक गृहनिर्माण योजना, गांधीग्राम पूल, शहरातील भूमिगत गटार योजना, रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठा मजिप्राकडे हस्तांतरित, कृषी विभागातील गैरप्रकार, पशू वैद्यकीय विभागातील भ्रष्टाचार, शिक्षकांचे प्रश्न, शेतकर्‍यांचे प्रश्न, शासकीय इमारतींचा प्रश्न, सेवानिवृत्ती कर्मचार्‍यांची समस्या, मनपातील कर्मचार्‍यांच्या समस्या आदीं प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, ठोस निर्णय किंवा आश्वासन मंत्र्यांकडून मिळाले नाही. नियम 93 अन्वये आमदार गोपीकिशन बाजोरिया व डॉ. रणजित पाटील यांनी उपस्थित केल्यावर मुख्यमंत्र्यांनी शिवणी विमानतळाचा प्रश्न एका महिन्यात निकाली काढण्याचे आश्वासन दिल्याचा लाभ झाला.

विकासासंदर्भातील प्रश्न वारंवार उपस्थित करूनही समाधानकारक उत्तरे दिल्या जात नाही. प्रश्न निकाली काढण्यात येत नाही. आश्वासने देण्यात येत आहेत. कुठलाही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.
-आमदार वसंतराव खोटरे, अकोला.

अधिवेशन असमाधानकारक
या अधिवेशनात सिंचनाच्या गंभीर प्रश्नावर असमाधानकारक चर्चा झाली. ओला दुष्काळग्रस्तांना मदत देण्याचा चांगला निर्णय झाला. मात्र, आता त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. पावसाळी अधिवेशन असमाधानकारक राहिले.
-आमदार गोपीकिशन बाजोरिया, अकोला.

सत्ताधार्‍यांचा दुजाभाव
सत्ताधारी पक्षांचा विरोधी पक्षातील आमदारांसंदर्भात दुजाभाव असतो. निधी देतानाही सातत्याने अन्याय केल्या जातो. अकोल्याला काहीही प्राप्त झाले नाही. या अधिवेशनातही शासनाने अकोलेकरांची निराशाच केली आहे.
-आमदार गोवर्धन शर्मा, अकोला.