आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई, ठाण्याच्या धर्तीवर अकोल्यात सिग्नल व्यवस्था आता बीओटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- मनपाला शहराच्या विकासासाठी प्राप्त झालेल्या निधीतून सिग्नल व्यवस्था सुस्थितीत करण्यात येणार आहे. त्यानंतर अकोल्यातील सिग्नल व्यवस्था दुरुस्ती व देखभालीसाठी बीओटी तत्त्वावर देण्याचा निर्णय घेऊ, असे सत्ताधार्‍यांनी स्पष्ट केले आहे. ‘बीओटीमुळे होऊ शकतो शहराचा विकास’ असे वृत्त ‘दिव्य मराठी’ने शनिवारी प्रकाशित केले होते.


शहराच्या विकासासाठी महानगरपालिकेला 26 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यांतील 1 कोटी रुपयांचा खर्च शहरातील ‘सिग्नल व्यवस्था‘, ‘झेब्रा क्रॉसिंग आदींवर खर्च करण्यात येणार आहे. या निधीतून ‘सिग्नल व्यवस्था’ सुरळीत केल्यावरही त्याच्या देखभाल व दुरुस्तीचे प्रश्न कायमच राहणार आहे. त्यामुळे ‘सिग्नल व्यवस्था’ सुरळीत करून त्यानंतर त्याची देखभाल व दुरुस्तीसाठी बीओटी तत्त्वावर देऊ, असे सत्ताधार्‍यांनी सांगितले.
बीओटीच्या माध्यमातून शहरात महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात अनेक उद्योजक इच्छुक आहेत. मात्र, त्यांना आतापर्यंत पोषक वातावरण मिळाले नाही. त्यामुळे आजपर्यंत शहराचा विकास झाला नाही. त्यामुळे त्यांना सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे. सत्ताधार्‍यांनी त्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे. श्हरातील सिग्नल व्यवस्था कोलमडली असूनआता पुन्हा सिग्नल व्यवस्था सुरळीत करून बीओटी तत्त्वावर सुरळीत चालवण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहे.

व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे लक्ष्य
शहराची वाहतूक सुरळीत करणे आवश्यक आहे. त्यासाठी सिग्नल व्यवस्थेवर प्राप्त निधीतून खर्च करण्यात येणार आहे. त्यानंतर देखभाल व दुरुस्तीसाठी बीओटी तत्त्वावर देऊ. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, समन्वयक मनपा, भारिप-बमसं,

तत्त्वावर इम्पॅक्ट
विकसित शहरांच्या वाटेवर मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर आदी शहरांमधील ट्रॅफिक सिग्नल बीओटी तत्त्वावर देण्यात आले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते सुरळीतरित्या सुरू आहेत. अकोल्यातील सिग्नल यंत्रणा गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. प्रशासनाचे पूर्ण सहकार्य 4सिग्नल व्यवस्था सुस्थितीत झाल्यावर त्याची देखभाल व दुरुस्तीला प्राधान्य देण्यात येईल. या गोष्टी चांगल्या व्हाव्यात यासाठी प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य राहील. दीपक चौधरी, आयुक्त, मनपा, अकोला.