आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola City Transport News In Marathi, Divya Marathi, Akola Municipal Corporation

प्रवाशांच्या जीवावर उठली बससेवा, मनपाचे दुर्लक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरामध्ये महापालिकेद्वारे शहर बस सेवा सुरू आहे. या सर्व बसेस मोडकळीस आल्या असून, जनतेसाठी त्या जीवघेण्या ठरत आहेत. या बस सेवेचा कंत्राटही संपला असून, या सेवेचा कंत्राट खासगी संस्थेला देण्यात आला आहे. महापालिका अस्तित्वात येण्यापूर्वी शहरातील बसची सेवा राज्य परिवहन महामंडळाकडे होती. त्याप्रमाणे ती आताही द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष प्रा. प्रदीप वाघ यांनी राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्याकडे केली आहे.
अकोलेकरांना माफक दरात व सुरक्षित शहर बसमधून सेवा मिळावी, त्यातून महापालिकेलाही कराच्या रूपातून उत्पन्न मिळावे, या उद्देशांसाठी महापालिकेने काही वर्षांपूर्वी शहरात प्रवासी वाहतूक करण्यासाठी प्रवासी व मालवाहतूक सहकारी संस्थेसोबत दहा वर्षांचा करार केला होता. त्या कराराची मुदत संपली आहे. या कराराप्रमाणे संस्थेनी मिनी बसेसचा वापर केला. परंतु, या सर्व बस देखभाल दुरुस्तीअभावी वाईट स्थितीत आहेत. काही बसेससाठी आरटीओकडून फिटनेस प्रमाणपत्रही घेतले नाही. त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात घालून या बस रस्त्यावर धावत आहेत. महापालिका अस्तित्वात येण्यापूर्वी शहरातील शहर बस सेवाही एसटी महामंडळाकडेच होती. नंतर अधिकार्‍यांच्या नकारात्मक धोरणामुळे ती बंद झाली. ती सेवा पुन्हा सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन प्रा. प्रदीप वाघ यांनी जीवनराव गोरे यांच्याकडे केले आहे.
खिळखिळय़ा बसेस आरटीओंनी केल्या जप्त
फिटनेस सर्टिफिकेट नसलेल्या तसेच अत्यंत खिळखिळय़ा झालेल्या बसेस शहरात धावत असून, त्या नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. अशा आशयाचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत राज्य उपप्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) तीन बसेसची तपासणी केली असता, त्या धावण्यायोग्य नसल्यामुळे त्या बसेस जप्त केल्या होत्या.