आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola Collector Arun Shinde Apple To Voter For Do Voting

न चुकता करा मतदान, जिल्हाधिकारी अरूण शिंदे यांचे आवाहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- विधानसभा सार्वत्रिक न‍िवडणूक प्रक्रीयेत जिल्ह्यातील प्रत्येक मतदार बंधु भगिनींनी सहभागी व्हावे. मतदानाच्या राष्ट्रीय कर्तव्याचे पालन करून १५ ऑक्टोबर रोजी चुकता मतदानाचा हक्क् बजावावा असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अरूण शिंदे यांनी केले आहे.
निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढविण्याच्या दृष्टीकोणातून मतदान जनजागृतीसाठी ११ ऑक्टोबर रोजी मतदार दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा प्रशासनातर्फे ‘एक तास देशासाठी’ ही संकल्पना जनजागृतीच्या माध्यमातून रूजविण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसिलदार दिनेश गिते, तहसिलदार राजेंद्र जाधव, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, मतदार जनजागृती अभियानाचे जिल्हा समन्वयक प्रकाश अंधारे यांनी अभियानात सहभाग नोंदविला.
मतदान केंद्रावर केले मार्गदर्शन
अकोलापूर्व अकोला पश्चीम मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रावर बीएलओंनी मतदारांना निवडणूक विषयक मार्गदर्शन केले. त्यांच्या समस्या सोडवून चुकता मतदान करण्याचे आवाहन केले. शहरातील बि. आर. हायस्कूल या मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदान केंद्राधिकारी विलास कंडारकर, प्रविण झडके, अनिल खडसे, विजय सहारे यांनी मतदारांना मार्गदर्शन केले.
का कशासाठी?
मी मतदान करणार
जातीचा विचार करता
समर्थ भारतासाठी
प्रांतभेद मनात आणता
समृध्द् भारतासाठी
भाषेचा अभिनिवेश बाळगता
क्षणिक स्वार्थाचा विचार करता
सशक्त भारतासाठी.