आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यापीठाचा गैरकारभार; महाविद्यालये केली बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - संतगाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या दुर्लक्षित कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सोमवारी शहरातील महाविद्यालये बंद ठेवून आंदोलन छेडले.

विद्यापीठाच्या कारभाराबाबत अनेक वेळा निवेदने देण्यात आली. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने याबाबत कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्यामुळे महाविद्यालय बंदचे आंदोलन पुकारण्यात आले, असे अभाविपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. अमरावती विद्यापीठात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू आहेत. विद्यार्थ्यांकडून जास्त शुल्क घेतल्या जाते. परीक्षा झाल्यानंतर ४५ दिवसात निकाल लावणे अपेक्षित असताना निकालासाठी अनेक महिने वाट पाहावी लागते. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पुढच्या सत्रात उशिरा प्रवेश घ्यावा लागतो. निकालात बरेच घोळ झालेले आहेत. पेपर तपासण्यासाठी प्राध्यापक नाहीत, त्याचे कंत्राट दिले जाते. शिवाय मूल्यांकन योग्यरीतीने केलेले नसते, यासह अनेक तक्रारींचे निवेदन विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आले. मात्र, त्यावर अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.

विद्यापीठाच्या कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, विद्यार्थ्यांना लवकर न्याय देण्यात यावा, अन्यथा ३० सप्टेंबर रोजी विद्यापीठावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा या वेळी पदाधिकाऱ्यांनी दिला. या वेळी जिल्हा संघटन मंत्री सदानंद खोब्रागडे, अक्षय जोशी, हर्षल अलकरी, सोहम कुळकर्णी, अभिलाषा इंगळे, पल्लवी भुईभार, सत्यजित आवळे, प्राजक्ता करे, पवन भुईभार, यज्ञदत्त देशपांडे, हर्षवर्धन देशपांडे यांच्यासह अभाविपचे कार्यकर्ते, विद्यार्थी उपस्थित होते.

ही महाविद्यालये होती बंद
शहरातीलमहाविद्यालय बंद ठेवण्यासाठी अभाविपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महाविद्यालय प्रशासनास बाध्य केले. आंदोलनादरम्यान, आज शहरातील रा. ल. तो. विज्ञान महाविद्यालय, ल. रा. तो. वाणिज्य महाविद्यालय, सीताबाई कला महाविद्यालय, श्री शिवाजी महाविद्यालय, श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय, मेहरबानू विज्ञान महाविद्यालय, नथमल गोयनका विधी महाविद्यालय आणि बाभुळगाव येथील शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालय बंद होते.त्यामुळे या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून परत जावे लागले. महाविद्यालयातील अभाविपचे कार्यकर्ते या बंदमध्ये सहभागी झाले होते.

(फोटो : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सोमवारी शहरातील महािवद्यालये बंद ठेवून आंदोलन छेडले)