आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola Congress Candidates Internal Politics News In Divya Marathi

काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांची गळती सुरूच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांची गळती थांबण्याचे नाव घेत नाही. एकापाठोपाठ एक पदाधिकारी काँग्रेसचा आपणहून त्याग करत आहेत. त्यामुळे ही निवडणूक काँग्रेसला हादरे देणारी ठरली आहे. ऑक्टोबरला पिंजर येथील माधवराव राठोड आणि अकोल्यातील अनिल झापे यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचे राजीनामे जिल्हाध्यक्षांकडे पाठवले.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी मिळण्यासाठी आयाराम गयाराम सुरू झाले. अकोला जिल्ह्यातही हा प्रकार घडला. काँग्रेसचे विजय देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. त्यानंतर पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. यांपैकी काहींनी इतर पक्षांत प्रवेश केला. काँग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस उदय देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर माजी महापौर सुरेश पाटील यांनी शिवसेनेत. काही दिवसांपूर्वी जिल्हा सरचिटणीस दीपक माने यांनीही पक्षावर नाराजी व्यक्त करत पदाचा तसेच सदस्यत्वाचा राजीनामा दिला. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून सुरू झालेली ही गळती अद्यापही थांबलेली नाही.

ऑक्टोबर रोजी जिल्हा काँग्रेस समितीचे सदस्य माधव राठोड यांनी आपल्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आले, नेत्यांनी कार्यकर्त्यांची कामे केली नाही, मानसन्मान दिला नाही. याबाबत पक्षश्रेष्ठींकडे वारंवार तक्रारी करूनही न्याय मिळाल्याने अखेर आपण पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, असे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना पाठवलेल्या राजीनाम्यात नमूद केले आहे. दरम्यान, पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते अनिल झापे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांच्याकडे पाठवला. १५ वर्षांपासून पक्षासाठी एकनिष्ठपणे काम केल्यानंतरही नेत्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. मला माझ्या कार्यकर्त्यांना सतत डावलण्याचे काम करण्यात आले. साधा व्यासपीठावर बसण्याचा मानही कधी नेत्यांनी दिला नाही. सतत मिळणाऱ्या या अपमानास्पद वागणुकीमुळेच आपण आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे. गळती थांबण्याचे नाव घेत नसल्याने ही निवडणूक काँग्रेसला जड जाऊ शकते.