आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola Congress District Woman's Committee Meeting

'राहुल गांधींच्या धोरणानुसार आम्ही कामाला लागलो'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - धुळे, नंदुरबार, वाशिम, अकोला जिल्हा परिषद निवडणुकांच्या पूर्वतयारीची ही वेळ आहे. त्यासाठी ग्रामीण भागातून अगदी ब्लॉकस्तरावर महिला संघटन मजबूत करण्याची गरज आहे. सत्ता नसली तरी चालेल. मात्र, संघटन मजबूत हवे. या राहुल गांधींच्या धोरणानुसार आम्ही कामाला लागलो आहोत. या कामात महिलांनी संघटित होऊन आपले अस्तित्व, क्षमता दाखवून द्याव्यात, असे आवाहन महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा कमलताई व्यवहारे यांनी केले.
येथील स्वराज्य भवनात जिल्हा महिला काँग्रेसतर्फे 31 ऑगस्टला अकोला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या धर्तीवर आढावा बैठक झाली. त्या वेळी उपस्थित महिलांना मागदर्शन करताना त्या बोलत होत्या. व्यासपीठावर विजयाताई धोटे, संजीवनी बिहाडे, मीनाताई आंबेकर प्रामुख्याने उपस्थित होत्या.मात्र या आरक्षणाचा खरा लाभ मिळण्यासाठी ग्रामीण स्तरापासून महिलांचे संघटन मजबूत करण्याची गरज आहे.
व्यवहारे म्हणाल्या, की महिलांना काँग्रेसमध्ये सुरुवातीपासून सत्तेत वाटा देण्यात आला. आता तर 50 टक्के आरक्षण दिले आहे. जिल्हास्तरावरील महिला काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी तालुका, ब्लॉक, प्रभागस्तरावर पदाधिकार्‍यांची नियुक्ती, मजबूत संघटनासाठी प्रयत्न करावेत. तसेच आगामी निवडणुकांमध्ये महिला राखीव म्हणून तिकीट देण्याऐवजी महिलांनी आपली क्षमता सिद्ध करून तिकिटासाठी पात्र ठरावे, तरच महिला आरक्षणाचा खरा लाभ होईल. त्यासाठी मजबूत संघटन गरजेचे आहे. तसेच निवडणुकीपूर्वी जात प्रमाणपत्र काढून घ्यावे, ऐनवेळी कुठल्या कारणाने आपली अडवणूक होऊ नये, असेही त्या म्हणाल्या. या वेळी संजीवनी बिहाडे, मीनाताई आंबेकर यांचीही समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा रूपाली ढेरे यांनी केले. संचालन रेणुका कापशे यांनी केले.
आशा चंदन यांनी आभार मानले. आढावा बैठकीनंतर कमलताई व्यवहारे यांना अनेक महिला पदाधिकार्‍यांनी विविध विषयांवरील निवेदने सादर करून चर्चा केली. त्यानंतर शहर विभागाची सभा घेण्यात आली.