आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला मनपाची स्थगित सभा आता होणार बुधवारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मनपाची २० नोव्हेंबर आणि त्यानंतर डिसेंबरला स्थगित केलेली सभा तब्बल १४० दिवसांनंतर बोलावण्यात आली आहे. ही सभा आता २२ एप्रिलला महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सकाळी ११ वाजता होत आहे.
२० नोव्हेंबरला बोलावलेल्या सभेत एकूण ११ विषयांवर चर्चा केली जाणार होती. यापैकी इतिवृत्त वाचून कायम करणे, शिवाजी महाराज प्रवेशद्वाराचे काम, दैनंदिन पाणीपुरवठा, पडीत वॉर्डांचे काम कंत्राटदारामार्फत पूर्ववत सुरू करणे, पाणीपुरवठा विभागातील थकित देयके, कोटी कोटी निधीबाबत चर्चा करून निर्णय घेणे या विषयांना मंजुरी दिली होती. तर फोर-जी वोडाफोन कंपनीकडून प्राप्त झालेल्या निधीचे नियोजन तसेच करारनाम्याव्यतिरिक्त केलेल्या कामाबाबत चर्चा करून निर्णय घेणे, विद्युत व्यवस्थेबाबत प्रशासनाकडून सुरू असलेली कार्यवाही, दैनंदिन स्वच्छता, सर्व निधी, अनुदानातून प्रशासनाकडे अद्यापही प्रलंबित असलेल्या तसेच प्रस्तावित केलेल्या कामाबाबत चर्चा करून निर्णय घेणे हे विषय स्थगित राहिले होते. स्थगित केलेली ही सभा पुन्हा डिसेंबरला बोलावली. परंतु, डिसेंबरलाही ही सभा स्थगित करण्यात आली.
नियमाप्रमाणे स्थगित सर्वसाधारण सभा पूर्ण केल्याशिवाय दुसरी सभा घेता येत नसल्यामुळे या स्थगित विषयांचा सोक्षमोक्ष लावणे गरजेचे होते. त्यामुळे नगरसेवकांनी मागणी केल्यानंतर ही स्थगित सभा बोलावली आहे.

विरोधकांचे काम करणार सत्ताधारीच

साडेसात वर्षांनंतर भाजप-सेनेची सत्ता आल्यावर भाजपमध्ये गटबाजीला उधाण आले आहे. त्यामुळे काँग्रेसप्रमाणेच आता भाजपमध्ये अंतर्गत लाथाळ्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे विरोधी गटाचे काम सत्ताधारी गटच करत आहेत. या सभेतही असेच चित्र दिसणार की सत्ताधारी एकत्र येणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे