आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola Corporation Need 14 Cr Collection In 39 Days

आर्थिक बजेट : अकोला मनपा प्रशासनास ३९ दिवसांत १४ कोटी वसुलीचे आव्हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला : महापालिका प्रशासनाला ३९ दिवसांत १५ कोटी रुपयांच्या वसुलीचे आव्हान पेलावे लागणार आहे. थकितसह चालू आर्थिक वर्षात महापालिकेला ३० कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट होते. यापैकी १६ कोटी रुपयांची वसुली झाली आहे, तर उर्वरित १४ कोटी रुपयांची वसुली महापालिकेला करावी लागणार आहे.
जास्तीत जास्त वसुली झाल्यासच कर्मचाऱ्यांच्या थकित वेतनाचा मुद्दा निकाली निघणार आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात मालमत्ता कर विभाग किती वसुली करणार? यावरच महापालिकेचे आर्थिक बजेट अवंलबून आहे.
महापालिकेचे मालमत्ता कर वसुली तसेच एलबीटी हे उत्पन्नाचे महत्त्वाचे स्रोत आहेत. या दोन स्रोतांव्यतिरिक्त इतर विभागांतून मोठ्या प्रमाणात महसूल मिळत नाही. त्यामुळेच या दोन्ही विभागांच्या वसुलीकडे प्रशासनाच्या वतीने लक्ष दिले जाते. परंतु, अद्यापही हजारो मालमत्तांची नोंद झालेली नाही. तसेच महापालिका अस्तित्वात आल्यापासून रिअसेसमेन्टही झालेली नाही.
मालमत्तांची नोंद तसेच रिअसेसमेन्ट झाल्यास महापालिकेला किमान मालमत्ता कर विभागाच्या माध्यमातून ७० ते ८० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकते, असा कर्मचाऱ्यांचाच दावा आहे. या अनुषंगाने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. परंतु, तूर्तास मालमत्ता कर वसुलीकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या अनुषंगाने प्रत्येक वसुली लिपिकाला दररोजचे उद्दिष्ट देण्यात आले असून, उद्दिष्ट पूर्ण झाल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

थकित वेतन देणे अवघड : कर्मचाऱ्यां चेदोन महिन्यांचे वेतन रखडले आहे. या महिन्यात वेतन दिल्यास पुन्हा तीन महिन्यांचे वेतन रखडणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वसुली झाल्यास थकित वेतनाचा मुद्दा निकाली निघेल. परंतु, वसुली कमी झाल्यास प्रशासनाला थकित वेतन देणे कठीण जाणार आहे.

सुविधांमुळे वसुलीवर परिणाम : महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा पुरेशा प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे मालमत्ता कराची वसुली करताना कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. सुविधा कोणत्याच देत नाही. मग, कराचा भरणा का करायचा? असा प्रश्न नागरिक करतात. त्यामुळे वसुलीवर परिणाम होतोय.

ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक वसुली : चालू आर्थिक वर्षात ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक वसुली झाली. या महिन्यात दोन कोटी ५५ लाख १५ हजार रुपये वसुली झाली.

१६ कोटी ४३ लाखांची वसुली
एप्रिल२०१४ ते १८ फेब्रुवारी २०१४ पर्यंत १६ कोटी ४३ लाख ९६ हजार रुपयांची वसुली झाली आहे. आता महापालिकेकडे ३९ दिवस राहिले आहेत. या ३९ दिवसांत १४ कोटी रुपये महापालिकेला वसूल करावे लागणार आहेत.

डिसेंबर महिन्यात कमी वसुली : यावर्षी एक कोटी ७७ लाख २० हजार, तर मागील आर्थिक वर्षात याच महिन्यात एक कोटी ९० लाख २९ हजार रुपये वसुली झाली होती.

उत्सुकता: याचालू आर्थिक वर्षात २० कोटींपेक्षा अधिक वसुली होणार की कमी होणार? याबाबत उत्सुकता लागली आहे.
९० टक्के वसुलीचा प्रयत्न
मालमत्ता कर विभाग या वर्षी ९० टक्के कर वसुलीचा प्रयत्न करणार आहे. सुटीच्या दिवशीही वसुली करून हे टार्गेट पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.'' विजय पारतवार, कर अधीक्षक