आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर वसुली मेळावा एकाच दिवसात बंद, 14 वर्षांची परंपरा केली खंडित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- महापालिकेच्या मालमत्ता विभागाने या वर्षीही सुरू केलेला मालमत्ता कर वसुली मेळावा, एकाच दिवसात बंद केल्याबद्दल महापालिका परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एकाच दिवसात मेळावा बंद करायचा होता, तर सुरू कशासाठी केला? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.
मार्चमध्ये अधिकाधिक कर वसुली व्हावी, या हेतूने दरवर्षी झोननिहाय कर वसुली मेळावा लावला जातो. यासाठी मंडप उभारण्याचा खर्च महापालिकेला करावा लागतो. नागरिकांना त्यांच्या परिसरातच कराचा भरणा करता यावा, यासाठीच या मेळाव्याचे आयोजन केले जाते. दरवर्षी कर वसुली मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने या वर्षीही मेळावा सुरू करण्यात आला. मार्चमध्ये दरशनिवारी रविवारी विविध विभागांत हे मेळावे घेण्याचे प्रशासनाने जाहीर केले. १४ मार्चला मेळावा घेतला.
या मेळाव्यातून लाखो रुपयांचा कर वसूलही झाला. परंतु, दुसऱ्या दिवशी प्रशासनाने हे कर वसुली मेळावे घेण्याचा निर्णय घेतला. एकाच दिवसात कर वसुली मेळावे घेण्याच्या निर्णयामुळे महापालिका परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. मार्चमध्ये अधिकाधिक कर वसुली व्हावी, या हेतूने दरवर्षी झोननिहाय कर वसुली मेळावा लावला जातो. मात्र यावर्षी ही वसूलीचा मेळावा एकाच िदवसात बंद करण्यात अाली अाहे.