आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी केले 60 ग्रॅम सोने जप्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - चोरीच्या गुन्ह्यातील सोने खरेदी-विक्री आणि जप्तीच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने सराफा व्यवसायी व एका मध्यस्थाकडून 16 नोव्हेंबरला एकूण 60 ग्रॅम सोने जप्त केले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 9 नोव्हेंबरला घरफोडीप्रकरणी तीन आरोपींना अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी महावीर मिर्शिलाल वर्मा, जाकीर अली शहादत अली यांना अटक केली. आरोपींच्या चौकशीनंतर सराफा व्यावसायिक नरेशकुमार रामसेवक शहा यांचे नाव समोर आले. वर्मा यांनी शहा यांना सोने विकले. त्यामुळे त्यांच्याकडून 30 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच पोलिसांनी मध्यस्थ सोनीकडूनही 16 नोव्हेंबरला 30 ग्रॅम सोने जप्त केले. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत 100 ग्रॅम सोने जप्त केले आहे.
सोने जप्तीप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. या सर्व आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.