आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रीकर निरीक्षक निकमला जामीन, लाच घेताना केली होती अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अकोला येथील व्यवसाय कर अधिकारी विनोद नथ्थूपंत निकम यास ४० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी एप्रिल रोजी रंगेहात अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला जामीन िदला आहे.

विक्रीकर भवन कार्यालयात गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान एसीबीने सापळा रचून विनोद निकमला ४० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली होती. तक्रारदारास नोटीस बजावून व्यवसाय कर कमी करून देतो, असे म्हणून ४० हजार रुपयांची लाच निकम याने मागितली होती. अशाप्रकारे दोन हजार करदात्यांना त्याने नोटीस पाठवून, त्यांच्याकडूनही पैसे उकळल्याचा संशय पोलिसांना होता. निकम पोलिस कोठडीत असताना एसीबीच्या अधिकार्‍यांनी त्याचे मुंबई येथील घर आणि नाशिक जिल्ह्यातील त्यांच्या संपत्तीची चौकशी केली होती. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती त्याच्याकडे आढळून आल्याची माहिती एसीबीने दिली आहे.