आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच कुटुंबातील चौघांची हत्या; अकोला जिल्ह्यातील हत्याकांड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला/बाळापूर - शेतीचा ताबा घेण्याच्या वादातून एकाच कुटुंबातील चौघांची कुºहाडीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान बाळापूर तालुक्यातील बाखराबाद येथे घडली. भाऊबंदकी असलेल्या बापलेकांनीच हत्याकांड घडवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. राजेश माळी, योगेश माळी, विश्वनाथ माळी आणि त्यांची मुलगी वनमाला माळी अशी मृतांची नावे आहेत.

मूळचे बाखराबाद येथे राहणारे भगवंतराव माळी हे सध्या अकोल्यातील गोकुळ कॉलनी येथे राहतात. त्यांचे चुलतभाऊ विश्वनाथ बळीराम माळी हे गावातच राहतात. बाखराबाद येथे अडीच एकर शेताच्या वादातून सोमवारी 14 एप्रिल रोजी जोरदार भांडण झाले. गावालगत असलेल्या अडीच एकर शेतीचा वाद न्यायालयात होता. न्यायालयाने यासंदर्भात 2 एप्रिलला राजेश माळी (40), योगेश माळी (35) आणि विश्वनाथ माळी (85) यांच्या बाजूने निकाल दिला. ही शेती 20 वर्षांपासून गजानन माळी यांच्या ताब्यात आहे. सोमवारी या जमिनीचा ताबा घेण्यासाठी राजेश आणि योगेश हे दोघे भाऊ अकोल्याहून बाखराबाद येथे गेले होते. या वेळी दोन्ही गटांमध्ये सुरुवातीला वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. गजानन वासुदेव माळी आणि नंदू गजानन माळी या बापलेकांनी कुºहाडीने वार करून राजेश माळी, योगेश माळी, विश्वनाथ माळी आणि त्यांची मुलगी वनमाला माळी (35) यांना शेतातच ठार केले.

यासंदर्भात उरळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

जीवघेणी भाऊबंदकी
मृत राजेश आणि योगेश हे दोघे भाऊ आहेत. विश्वनाथ हे त्यांचे चुलते व वनमाला ही विश्वनाथ यांची मुलगी आहे. तर मारेकरी नंदू माळी आणि गजानन माळी हे मृताचे भाऊच आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून यांच्यात शेतीचा वाद सुरू होता.