आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बैठकीत गाजला ‘कचरा’; गांधीग्रामचा पूल कधी होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शहरातील कचर्‍यामुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवारी गाजली. या बैठकीत विविध ठिकाणी साचलेल्या कचर्‍याचा मुद्दा पदाधिकार्‍यांनी उपस्थित केला. उपायुक्त चंद्रशेखर गुल्हाने यांना नियमित शहरातील साफसफाई करण्याचे कडक निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री राजेंद्र दर्डा होते. खासदार संजय धोत्रे, आमदार डॉ. रणजित पाटील, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार हरिदास भदे, आमदार बळीराम शिरस्कार, जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा इंगळे, विभागीय आयुक्त डी. आर. बन्सोड, जिल्हाधिकारी अरुण शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे यांची उपस्थिती होती.

गांधीग्राम येथील पूल होण्याची गरज आहे. चर्चा करण्यापेक्षा अतिवृष्टी बाधितांची समस्या जाणून घेण्याची गरज आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी व्यक्त केली. नगरसेविका शाहीन अंजुम यांनी कचर्‍याचा मुद्दा उपस्थित केला होता. हा मुद्दा त्यांनी ताणून धरल्याने सभागृहातील वातावरण गंभीर झाले होते. महापालिकेच्या नगरसेविकापदाचा राजीनामा देण्याची धमकी त्यांनी दिली. पालकमंत्र्यांनी याबाबत अधिकार्‍यांना खडसावले व नियमित सफाई करण्याचे आदेश दिले. काँग्रेस नेते माजी आमदार अजहर हुसेन यांनी आधार कार्डच्या नोंदणीचा प्रश्न उपस्थित केला. निखिलेश दिवेकर यांनी महापालिकेच्या शाळा भाडे अनुदानाचा मुद्दा उपस्थित केला.

पातूर ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न प्रलंबित आहे. बाळापूर येथे प्रशासकीय इमारतीची गरज, पातूर येथे काजळी येथील वाहून गेलेला पूल दुरुस्त करा व शेतकर्‍यांना मोबदला द्यावा अशी मागणी आमदार बळीराम शिरस्कार यांनी केली.

मंत्रीजी हमारी सुनो.

नगरसेविका शाहिन अंजुम यांनी पालकमंत्र्यांना ‘हमारी सुनो’ असे म्हणत आवाज बुलंद केला. ‘हम को सब पता है, वार्ड का कचरा साफ होना जरुरी है !’ असे म्हणत त्यांनी कचर्‍याची समस्या अधोरेखित केली. या वेळी पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठकही महापालिका व जिल्हा परिषदेच्या सभेप्रमाणे होऊ नये, अशी समज दिली.

अतिवृष्टिने बाधितांचे अहवाल द्या
या बैठकीपूर्वी जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात पालकमंत्र्यांनी बैठक घेतली. गांधीग्राम पुलाबाबत बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना या वेळी पालकमंत्र्यांनी खडसावले. 10 ऑगस्टपूर्वी अतिवृष्टीने बाधितांचे अहवाल द्यावे.

फोन नेहमी बंद असतो
जिल्हय़ातील एका वरिष्ठ अधिकार्‍याचा फोन नेहमी बंद असतो, असा संताप पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. स्थानिक नागरी स्वराज्य संस्थेचे अधिकारी असल्याची चर्चा येथे होती. वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन कोण, असा प्रश्न त्यांनी केला.

कोण काय म्हणाले..
सदस्य, नियोजन समिती विजय अग्रवाल
शहरातील 700 घरकुल, आयएचडीपीचे 18 कोटी पडून, दलितेतर निधीला मंजुरी द्यावी. किल्ल्याचे काम पुरातत्त्व विभागामुळे थांबले. कचरा उचलणार्‍या कंत्राटदाराचा दोष नाही, करार चुकीचा झाला आहे, तो बदलण्याची गरज आहे. शहरातील कचरा उचलला गेला पाहिजे, आणि स्वच्छ झाले पाहिजे.

आमदार डॉ. रणजित पाटील
वैद्यकीय महाविद्यालयात 50 जागा वाढल्या का, बांधकामासाठी वैद्यकीय रुग्णालयास मिळालेले 39 कोटी पडून का आहे. बार्शिटाकळी ग्रामीण रुग्णालयाचे काम का थांबले तसेच खारपाणपट्टय़ाच्या विकासासाठी विदर्भ सघन सिंचन कार्यक्रमात आलेल्या निधीच्या नियोजनासाठी कर्मचार्‍यांचा अभाव आहे.

आमदार हरिदास भदे
नवीन बांधकाम दरानुसार गांधीग्रामच्या पुलाची निर्मिती करा. या कामासाठी मंत्रालयातील प्रत्येक टेबलवर पैसा खर्च करावा लागतो. पिकांचा सव्र्हे करा, मदतीपासून शेतकरी वंचित राहू नये, शहरातील झोपडपट्टीचा सव्र्हे करा, लोकांना पॅकेजचा फायदा द्या, स्थानिक विकास निधीचे पैसे द्या.

खासदार संजय धोत्रे
गांधीग्राम येथील पुरात 11 लोकांना वाचविणार्‍या बचाव पथकाचे अभिनंदन. पूर व पाण्याच्या स्थितीचा उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी लोकप्रतिनिधींना एसएमएस करावा. सिंचन व बांधकाम विभागात समन्वयाची गरज, शहरातील कचरा साफ होत नसल्याची तक्रार आहे.