आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२८७ गावात दूषित पाणी; जलजन्य आजारांची लागण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- महानते अकोला या मार्गादरम्यान शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरील अवैध नळजोडण्या १७ जानेवारीला चोख पोलिस बंदोबस्तात तोडण्याची कारवाई केली जाणार आहे. बार्शिटाकळी शहरातून गेलेल्या मुख्य जलवाहिनीवर २७ पेक्षा अधिक अवैध नळजोडण्या असून, यातून २४ तास पाणीपुरवठा सुरू असतो.
शहराला काटेपूर्णा प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. १९७७ साली ६०० मिलिमीटर व्यासाची महान ते अकोला अशी मुख्य जलवाहिनी अंथरण्यात आली. सीआय पद्धतीची ही जलवाहिनी जुनी असून, बार्शिटाकळी शहरातील जुन्या मार्गावरून ती गेली आहे. बार्शिटाकळी ग्रामपंचायतीलाही याच जलवाहिनी वरून पाणीपुरवठा केला जात होता. परंतु, ग्रामपंचायतीने पाणी पट्टीचा भरणा केल्याने मनपाने पाणीपुरवठा बंद केला आहे. गावात २७ पेक्षा अधिक अवैध नळजोडण्या असल्याने पाण्याची चोरी होत आहे. याबाबत मनपाने ग्रामपंचायतीला वारंवार तोंडी तसेच लेखी सूचना दिली, परंतु त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे मनपाने पोलिसात पाणी चोरी विरुद्ध तक्रार दाखल िदली. परंतु, कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने पोलिस बंदोबस्ताशिवाय कारवाई करता येणार नाही, असे बार्शिटाकळी पोलिसांनी स्पष्ट केले होते. यानंतर मनपाने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे पोलिस बंदोबस्ताची मागणी केली होती. पोलिस प्रशासनाची ही मागणी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी मान्य केली असून, शनिवार, १७ जानेवारीला या अवैध नळजोडण्यांवर कारवाई केली जाणार आहे.
२८७ गावांतील पाणी नमुने रसायनयुक्त

मुख्यजलवाहिनीवर थेट नळजोडणी घेऊन या नळजोडणीवरून अंतर्गत जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. मुख्य जलवाहिनीवर जोडण्या असल्याने २४ तास पाणीपुरवठा सुरू असतो. त्यामुळे गावात पाण्याचा अपव्ययही मोठ्या प्रमाणात होतो.
दूषीत पाणी पिल्याने नागरिकांना ग्रॅस्ट्रो, कॉलरा, हगवण या जलजन्य आजारांची लागण झाली अाहे.
२.३ किलोमीटर जलवाहिनीवर पाणीचोरी
बार्शिटाकळीगावातून २.३ किलोमीटरची मुख्य जलवाहिनी गेली आहे. या जलवाहिनीवर एक ते दोन इंची नळजोडण्या अवैधरीत्या घेण्यात आल्या आहेत. महापालिका पाणीपुरवठा विभागाने २७ अवैध नळजोडण्या हुडकून काढल्या आहेत. विशेष म्हणजे या अवैध नळजोडण्यांचे शूटिंगही केले आहे.
अधिकाऱ्यांना धारेवर धरू
जिल्हापरिषद प्रशासनामार्फत सर्व प्रकारच्या सोयीसुविधा, निधी ग्रामीण भागात उपलब्ध करून दिला जातो. मात्र, गटविकास अधिकारी ग्रामसेवकांच्या दिरंगाईमुळे गावात नागरिकांना अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून, याचा जाब अधिकाऱ्यांना नक्की विचारल्या जाईल.'' शोभाताई शेळके,सदस्या,जिल्हा परिषद, अकोला
किडनी, त्वचारोग वाढले
प्रामुख्यानेअकोट, तेल्हारा अकोला तालुक्यातील गावांमध्ये किडनीचे रुग्ण वाढत चालले आहेत. दूषित पाणी पिण्यात येत असल्याने त्वचारोग होण्याचे प्रमाणही वाढते आहे. प्रामुख्याने लहान मुले याचे बळी ठरत आहेत.
फिल्टर प्लांटची गावोगावी गरज
दूषितजलस्रोत अालेल्या गावांमध्ये फिल्टर प्लांट लावणे गरजेचे आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने यादृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, तरच नागरिकांना शुद्ध पाणी पिण्यास मिळू शकेल.
शुद्धीकरणानंतरच प्या पाणी
जिल्ह्यातदूषित पाण्याचे सर्वाधिक स्रोत आहेत. आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात घेतलेल्या नमुन्याच्या अहवालानंतर २८७ गावांतील जलस्रोत दूषित असल्याचे निष्पन्न झाले आहेत. पाणी शुद्धीकरणानंतरच पिण्यासाठी वापरण्याच्या सूचना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला देण्यात आल्या आहेत.'' {डॉ. आशिषभारती, सहायकजिल्हा आरोग्य अधिकारी, अकोला