आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा बँक पुन्हा कोरपे गटाच्या ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - गेल्या अनेक वर्षांपासून अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरील आपले वर्चस्व या वेळीही कोरपे गटाच्या सहकार पॅनलने कायम ठेवले. २१ पैकी ११ जागा यापूर्वीच बिनविरोध जिंकणार्‍या या गटाने मे रोजी झालेल्या मतमोजणीतही उर्वरित दहा जागांवर कब्जा मिळवला. सहकार पॅनलविरोधात एकसंध असा कोणत्याही गटाने उमेदवार दिले नव्हते. वेगवेगळ्या मतदारसंघात विरोधकांनी संघर्ष करण्याचा प्रयत्न केला.

सहकार कायद्यातील बदलानुसार या वर्षी बँकेचे संचालक मंडळ २१ जणांचे करण्यात आले. यापैकी ११ उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे दहा जागांसाठी मे रोजी मतदान घेण्यात आले. येथील आयएमए सभागृहात मे रोजी मतमोजणी झाली. या मतमोजणीत दहाही उमेदवार सहकार पॅनलचे निवडून आले. यात बार्शिटाकळी मतदारसंघात दामोदर काकड, अकोटमधून रमेश हिंगणकर, तेल्हारामधून रूपाली खारोडे, वाशीममधून महादेव काकडे, मालेगावमधून दिलीप जाधव, मानोरामधून उमेश ठाकरे, कारंजामधून श्रीधर कानकिरड, महिला मतदारसंघातून भारती गावंडे, मंदाताई चौधरी, पगारदार नोकरांच्या पतसंस्था मतदारसंघातून हिदायत पटेल यांचा समावेश आहे.

एका मताने विजय - तेल्हारा मानोरा
या मतदारसंघात अतिशय चुरशीची निवडणूक झाली. तेल्हारा मतदारसंघात बँकेचे विद्यमान संचालक सुरेश तराळे यांना १५, तर त्यांचे प्रतिस्पर्धी रूपाली खारोडे यांना १६, तर मानोरा मतदारसंघात सुरेश गावंडे यांना १६, तर उमेश ठाकरे यांना १७ मते मिळाली. अकोट मतदारसंघात माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन पुंडकर यांनी रमेश हिंगणकर यांच्या विरोधात दंड थोपटले होते. परंतु, रमेश हिंगणकर यांनी ४५ मते घेतली, तर गजानन पुंडकर यांना केवळ आठ मतांवर समाधान मानावे लागले.

शेतकर्‍यांच्या हितासाठी कटिबद्ध
शेतकर्‍यांच्याफायद्यासाठीच आतापर्यंत काम करत आलो आहोत, यापुढेही हे काम सुरूच राहील. निवडणुकीतील विजय ही चांगल्या कामाचीच पावती आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या िहतासाठी कटिबद्ध आहोत.- डॉ. संतोषकुमार कोरपे
बातम्या आणखी आहेत...