आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोटमध्ये दुचाकी वाहन परवाना तपासणी मोहीम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट- शहरात दुचाकी वाहनचालकांचा परवाना तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. ही मोहीम शिवाजी चौक, सोनू चौक, जयस्तंभ चौक, याकूब पटेल चौक, यात्रा चौक, नरसिंग रोड आदी भागांमध्ये राबवण्यात आली. या मोहिमेत प्रथमच महिला पोलिसही सहभागी झाल्या असून, रविवारी ५४ विनापरवाना वाहनधारकांकडून १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

शहरामध्ये बहुतांश नागरिकांकडे वाहन चालवण्याचा परवाना, वाहनाची कागदपत्रे नसल्याने त्यांच्याविरुद्ध शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मोहीम राबवली आहे. दुचाकीचालकांकडील परवाना, मूळ कागदपत्रे आदींची तपासणी केली आहे. तसेच ट्रिपलसीटचालक, फॅन्सी नंबरप्लेट, विनानंबरच्या गाड्या चालवण्याऱ्यांकडून रोख स्वरूपात दंड वसूल करण्यात आला. या मोहीमेत पहिल्यांदाच महिला पोलिस कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेतल्याने विनापरवाना वाहन चालवणाऱ्या तरुणी महिलांचीसुद्धा तपासणी करण्यात आली. ही मोहीम ठाणेदार कैलास नागरे, उपनिरीक्षक अनिल मानेकर यांनी राबवली आहे.

अल्पवयीन मुलांना वाहने देऊ नका

अल्पवयीनमुले भरधाव वाहने चालवत आहेत. त्यामुळे अनेक वेळा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये.'' कैलासनागरे, ठाणेदार, अकोट
अकोटमध्ये विनापरवाना वाहनधारकांविरुद्ध मोहीम राबवली.
बातम्या आणखी आहेत...