आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola District Planning Department Does Not Receive A Positive Response

अकोला जिल्हा नियोजन विभागाकडून मिळत नाही सकारात्मक प्रतिसाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- गेल्या सहा महिन्यांपासून खासदार, आमदार आणि जिल्हा नियोजन समितीचा सुमारे दहा कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाच्या टक्केवारीत अडकल्याचा आरोप होत आहे. यातील काही कामांची निविदा प्रक्रियादेखील झाली असून, कामेही प्रगतीपथावर आहे. मात्र, प्रशासनाने केवळ टक्केवारीसाठी निधीला घातलेली खीळ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

2012-13 मध्ये जिल्हा नियोजन समितीचा पाच कोटींचा निधी असून, तीन कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी खासदारांचा आहे. आमदारांचा दीड कोटीचा निधी असा सुमारे दहा कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजन विभागाकडे अडक ल्याचा आरोप होत आहे. याबाबत संबंधितांनी विचारणा केली असता, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचाही आरोप होत आहे. जिल्हा नियोजन समिती, आमदार व खासदार निधीतून विविध योजनांची कामे जिल्ह्यात सुरू आहेत. यातील काही कामे जवळपास पूर्ण झाली असून, बर्‍याच कामांची निविदा प्रक्रिया झाली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून संबंधित निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला मिळालाच नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे अनेक कंत्राटदारांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

आचारसंहितेमुळे अडकू शकतो निधी

एप्रिल महिन्यात सार्वत्रिक निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंत्राटदारांना केलेल्या कामांची देयके मिळालेली नाहीत. अशातच निवडणूक जाहीर झाल्यास आचारसंहितेमुळे विकासकामे करता येणार नाही. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी याकडे लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

निधी वितरित केला

विकासकामांसाठी शासनाकडून आलेल्या निधीचे नियोजन योग्यरित्या करण्यात येते. जिल्ह्यात आवश्यक ठिकाणी विकासकामे हाती घेण्यात येतात. खासदार निधीचे पैसे देण्यात आले आहे, तर आमदार निधी संपत आला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीचे पैसेही देण्यात आले. यातील उर्वरित रक्कम लवकरच देण्यात येणार आहे.’’ ए. एस. चांदूरकर, जिल्हा नियोजन अधिकारी.