आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola East Constituency,latest News In Divya Marathi

अकोला पूर्वतील लढा प्रतिष्ठेचा, दिग्गज नेते एकाच वेळी रिंगणात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अकोलापूर्व मतदारसंघात बदल घडवून आणण्याची भाषा करणाऱ्या पक्षांचीच युती, आघाडी फिस्कटल्यामुळे अंदाज बांधणे कठीण झाले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप-सेनेच्या उमेदवाराला या मतदारसंघात चांगली आघाडी मिळाल्याने त्या लाटेचा फायदा विधानसभा निवडणुकीत निश्चित होईल, ही भाषा युती तुटल्याने निष्प्रभ ठरली. एकीकडे विस्कटलेली युती, आघाडी तर पक्की मतबँक असा सामना दिसत आहे. जागा मिळवण्यापासून प्रतिष्ठेचा प्रश्न बनवणाऱ्या नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.

2004,2009 च्या निवडणुकीत भारिपचे हरिदास भदे यांनी विजय प्राप्त केला. परंतु, गेल्या लोकसभा निवडणुकीत भारिपचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांना अकोला पूर्वमध्ये कमी मते मिळाल्याचे खापर भदे यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न भारिपच्या कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त करून केला होता. त्याचा काहीही परिणाम भदे यांना उमेदवारी मिळवताना झाला नाही. पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर विश्वास दाखवला, तिसऱ्यांदा त्यांना उमेदवारी मिळाली. या वेळी भदे हॅट््ट्रिक करतात का, ही चर्चा सुरू झाली आहे. पक्की मतबँक तसेच प्रवाहित मतांचा त्यांना होणारा फायदा त्यांची जमेची बाजू मानली जाते. गेल्या दोन िनवडणुकीमध्ये भदे यांना मराठा मतांच्या विभाजनाचा फायदा झाला, असा तर्क लावला जातो. शिवसेनेकडून गोपीकिशन बाजोरिया तर सहकार क्षेत्रामध्ये कार्यरत रणधीर सावरकर (भाजप), िशरीष धोत्रे (राष्ट्रवादी काँग्रेस), डॉ. सुभाषचंद्र कोरपे (काँग्रेस) हे प्रमुख उमेदवार भदे यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. भदे यांच्याविरुद्ध एकास एक लढत अत्यंत चुरशीची झाली असती, परंतु सध्याची स्थिती भदे यांना मोठे आव्हान देणारी नाही, असे मतदारसंघात बोलले जात आहे. भदे यांच्याविरुद्ध जि. प. च्या माजी अध्यक्ष पुष्पाताई इंगळे, प्रवीण जगताप यांनी बंडखोरी केली आहे. मात्र, पुष्पाताईंची उमेदवारी आंबेडकरी चळवळीच्या विरोधात असल्याने भारिप उमेदवारावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, असा दावा केला जात आहे. २००४ मध्ये हरिदास भदे पहिल्यांदा भारिपकडून उभे राहिले. डॉ. भांडे यांच्या बहुजन महासंघाने आंबेडकरांसमवेत आघाडी केल्यामुळे भारिप-बमसं असा पक्ष अस्तित्वात होता. परंतु, या निवडणुकीतही बहुजन महासंघाकडून डॉ. दशरथ भांडे उभे होते. भदे यांना ४४,१४०, विजय मालोकार यांना ३९,३४१, काँग्रेसचे उदय देशमुख यांना २३,९३१, सेनेचे श्रीरंग पिंजरकर यांना ३०,८४५ तर भांडे यांना १३,२२१ मते मिळाली होती. भदे पहिल्यांदा िनवडून आले. २००९ मध्ये भदे यांची मते चार हजारांनी वाढली. ४८,४३८ मते त्यांना त्या वेळी मिळाली. सेनेचे गुलाबराव गावंडे यांना ३४,१९४, मालोकार यांना २९,०६५ तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे विजय मते यांना २९,५११ मते मिळाली.
16 नगरसेवक
बाजोरिया यांना निवडणूक लढवण्याचे कसब चांगलेच ज्ञात आहे. त्यामुळे सर्वशक्ती त्यांनी पणाला लावलेली दिसत आहे. शिरीष धोत्रे, रणधीर सावरकर, डॉ. सुभाषचंद्र कोरपे पहिल्यांदाच िवधानसभेची निवडणूक लढवत आहेत. सहकाराचा गाढा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. मात्र, विधानसभेचे गणित वेगळे असते. एकाच विचारांची, नात्यागोत्यातील मंडळी असली तरी राजकारणाचा धर्म वेगळा असतो या न्यायाने तिन्ही उमेदवार भाग्य आजमावत आहेत. िशरीष धोत्रे यांच्यासाठी ज्येष्ठ सहकार नेते वसंतराव धोत्रे यांनी प्रतिष्ठेचा विषय केलेला आहे तशीच स्थिती रणधीर सावरकर यांच्यासाठी खासदार संजय धोत्रे यांची राहणार आहे.