आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोला पूर्व मतदारसंघाला आहे विकासाची आस, अनेक प्रश्न आहेत प्रलंबित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आकोला- अकोलापूर्व मतदारसंघ बोरगावमंजू म्हणून ओळखला जात असताना ग्रामीण होता. परंतु, आता त्याला शहरी ग्रामीण असे स्वरूप आले आहे. अकोला तालुक्यातला मोठा मतदारसंघ असून, येथून निवडून गेलेल्या आमदारांनी काही अपवाद वगळता मंत्रिपदेही उपभोगली आहेत. तरीही या मतदारसंघाचा विकास झाला नाही. जातीपातीचे राजकारण केले की विकासाची कशी वाट लागते याचे उत्तम उदाहरण म्हणून याही मतदारसंघाकडे पाहावे लागेल.
या मतदारसंघामध्ये खासदार संजय धोत्रे, आमदार हरिदास भदे, जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई यांचे गाव आहे. तरीही विकासाची मागमूसदेखील नाही. या मतदारसंघामध्ये खारपाणपट्ट्यातील जास्तीत जास्त गावे येतात. काटेपूर्णा प्रकल्पाचा पूर्व प्रवाह या मतदारसंघातच आहे. त्याचे लाभधारक खासदार संजय धोत्रे, आमदार डॉ. रणजित पाटील, आमदार हरिदास भदे, जि. प. अध्यक्ष शरद गवई आहेत. मात्र, पिण्याचे पाणी, गावातील रस्ते, शेतीचे सिंचन याबाबत प्रगती नाही. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिक्षेत्राचा बराच भाग या मतदारसंघात येतो. त्याचाही लाभ शेतीचा कायापालट होण्यात झालेला नाही.सुकळी, येळवण येथे महानुभाव पंथाचे तीर्थस्थान आहे. बोरगावमंजूला जैन धर्मीयांचे तीर्थस्थान आहे. राष्ट्रीय महामार्ग सहावर तसेच रेल्वेच्या मुख्य लोहमार्गावर हा भाग आहे. तरीही या भागात मोठे प्रकल्प अद्याप आलेले नाहीत. अकोला आैद्योगिक वसाहतदेखील या भागात येते. तरीही काँग्रेस, िशवसेना, भारिप कोणीही असो मतदासंघाला न्याय मिळाला नाही. मंत्रिपदे मिळूनदेखील विकासाच्या बाबत हा भाग अविकसित राहिला.
मोठ्या शैक्षणिक संस्था, रुग्णालये येथे नाहीत. ग्रामीण भागात गावापर्यंत रस्ता, शाळा, पिण्याचे शुद्ध पाणी पोहोचू शकले नाही. पळसो बढे खासदार धोत्रे, शरद गवई यांचे गाव परंतु, येथे पाणीपुरवठा योजनाच नाही. वजनदार लोकप्रतिनिधी असूनही गावांचे प्रश्न थिजून पडले आहेत. लोकांना न्याय कोण देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शेतीला नवीन आयाम प्राप्त झाला आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योग, शेती उपयुक्त बाजारपेठ उपलब्ध होण्याची गरज आहे. कापूस, सोयाबीन, तूर, गहू, हरभरा या पिकांना बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. येणाऱ्या िनवडणुकीत िवकासाचा मुद्दा कळीचा ठरावा, याबाबत बोलले जात आहे. आत्मा चळवळीतही लोकप्रतिनिधी हिरिरीने भाग घेताना दिसत नाहीत.