आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आला रे आला लालबागचा राजा, अकोल्यात वाजतगाजत वारकरी पथकासह मिरवणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शहरातील गणेशोत्सवाचे आकर्षण व श्रद्धेचे केंद्र बनलेल्या लालबागच्या राजाचे स्वागत वाजतगाजत वारकरी, दिंडी पथकाच्या गजरात करण्यात आले. ज्योतीनगरातून मानेक चित्रपटगृहासमोरील मंडपात 3 सप्टेंबरला लालबागचा राजा विराजमान झाला.

अकोल्याचा राजा लालबागचा राजाची 3 सप्टेंबरला दुपारी 3 च्या सुमारास सिद्धीविनायक मंदिरापासून मिरवणूक काढण्यात आली. तत्पूर्वी त्याचे विधीवत पूजन करण्यात आले. मिरवणुकीच्या अग्रभागी ट्रॅक्टरवर गणपती गीते व सूचना देणे सुरू होते. त्यामागे तीनशे वारकरी दिंडी पथकासह भजने म्हणत या मिरवणुकीत सहभागी झाले होते. ही मिरवणूक जठारपेठ, होलीक्रॉस कॉन्व्हेंट, रतनलाल प्लॉट चौक, टॉवर चौक, बसस्थानक, गांधी मार्ग, शहर कोतवाली, टिळकरोड मार्गे स्थापना स्थळावर पोहोचली. लालबागच्या राजाच्या स्वागतासाठी मिरवणूक मार्गावर अनेक ठिकाणी महिलांनी रांगोळ्या साकारल्या होत्या. रतनलाल प्लॉट चौकात तर लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी करण्यात आली. मिरवणुकीत र्शी माळीपुरा एकता गणेशोत्सव मंडळ, लालबाग चौकचे अध्यक्ष अँड. मोतीसिंह मोहता, उपाध्यक्ष कैलास रणपिसे, सचिव राजेश चंदनबटवे, विजय शर्मा, राजू सोनटक्के, किशोर तिवारी, आदेश पुट्टी, मंगेश चंदनबटवे, राजेश जयराज, लल्ला चंदनबटवे, राजू विश्वकर्मा, प्रकाश काळे, दशरथ दादाराव, राकेश शुक्ला, अमित कांबळे, उमेश शर्मा आदींसह सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सहभाग होता. विशेष म्हणजे कालीचरण महाराजांनीही हजेरी लावली तसेच लालबागचा राजाचा रथ पुरुष कार्यकर्त्यांसह महिलांनीही ओढला.