आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोल्यातील गॅस सिलिंडरचा पुरवठा तातडीने सुरळीत करा, जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शहरातील गॅस सिलिंडरचा काळाबाजार व कृत्रिम तुटवडा कसा होत आहे, याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रकाशित केल्यानंतर जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी बैठक घेऊन शहरातील गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले.

गॅस तुटवड्याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी पुरवठा अधिकारी नरेश वंजारी व विक्री अधिकारी लोकेश सक्सेना एचपीसीएल, एलपीजी यांची आपात्कालीन बैठक घेऊन गॅस तुटवड्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. या बैठकीत विक्री अधिकारी म्हणाले की, निंभोरा या गॅस पॉइंटवरून शहराला गॅस पुरवठा करण्यात येतो. गॅसचा पुरवठा हजीरा सुरत येथून निंभोरा येथे करण्यात येत असून, टँकरच्या पुरवठय़ामध्ये कमतरता झाल्यामुळे तीन ते चार दिवसांपासून अकोला शहराला गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे तसेच त्यांनी हजीरा येथून गॅसच्या दोन टँकरऐवजी पुरवठा करण्याबाबत आवश्यक ती उपाययोजना करण्यात येत आहे.