आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेडिकल कॉलेजमध्ये दहीहंडीच्या दिवशी नागपंचमी; रॅगिंगच्या नावाखाली बेल्टने लावतात लग्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या भावी डॉक्टरांसोबत अमानवी रॅगिंगचा किळसवाणा प्रकार होत आहे. रोज पहाटे तीन ते चार तास होणार्‍या या रॅगिंगमुळे ज्युनियर विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. पण, रॅगिंग घेणार्‍या सीनियर्सची तक्रार केल्यास त्यांचे करिअर थांबू शकते, या भीतीपोटी विद्यार्थी निमूटपणे रॅगिंग सहन करत आहेत. दरम्यान, अनेक पालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष रणजित राठोड यांच्याकडे याविषयीची तक्रार केली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्या वर्षातील एमबीबीएसचे प्रवेश 12 ऑगस्टला झाले. दरम्यान महाविद्यालयातील एका खोलीत 27 विद्यार्थ्यांना कोंडून त्यांची रॅगिंग घेण्यात येत आहे. पण, सीनियर्सच्या विरोधात तक्रार करणे महागात पडू शकते, या भीतीपोटी कोणी पुढे यायला तयार नाहीत.वसतिगृहात वॉर्डन नाही
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृहात वॉर्डन राहत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी राजकीय नेत्यांकडे केली आहे. रात्री अपरात्री ज्युनियर विद्यार्थ्यांना सीनियर रूमवर बोलवतात. ज्युनियर विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात सीनियर कधीही आकस्मिकपणे येतात.

समिती आहे, स्क्वॉड नाही
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या वर्षी 25 जणांची रॅगिंग प्रतिबंधक समिती गठित करण्यात आली. या समितीत 23 जण महाविद्यालयातीलच आहेत. बाकी तिघे बाहेरचे आहेत. यापैकी नागरी प्रशासन सेवा, पोलिस दल व वरिष्ठ पत्रकार कोण, याची माहिती अधिष्ठाता देऊ शकले नाहीत. रॅगिंग प्रतिबंधक स्क्वॉॅड मात्र महाविद्यालयात स्थापन झालेले नाही. या समितीने पहिल्या तीन महिन्यांत दर पंधरा दिवसांनी महाविद्यालय रॅगिंग फ्री असल्याबाबत तपासणी केली नसल्याचे उघडकीस आले आहे.

दोन वॉर्डन
डॉ. ए. ए. मुखर्जी हे चीफ वॉर्डन म्हणून मुलांच्या वसतिगृहासाठी काम करतात, तर डॉ. एस. एन. हुसेनी हे पहिल्या वर्षाच्या मुलांचे वॉर्डन आहेत. यापैकी एकही रात्री वसतिगृहात उपस्थित नसतात. त्यामुळे रॅगिंगचा त्रास रोज सहन करावा लागतो, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. दरम्यान, डॉ. मुखर्जी यांनी असा प्रकार होत नसल्याचे सांगितले.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, कशी होते रॅगिंग...