आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामार्गावरील विचित्र अपघातामुळे वाहतूक विस्कळीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - उभ्या ट्रकवर बस आणि ट्रेलर धडकून झालेल्या विचित्र अपघातामुळे एक तास वाहतूक विस्कळीत झाली. महामार्ग क्रमांक सहावर काटेपूर्णा गावाजवळ 11 डिसेंबरला सकाळी हा अपघात झाला. काटेपूर्णा गावाजवळ रस्त्याच्या बाजूला ट्रक (क्रमांक - एमएच 27 एक्स 2594) उभा होता. अकोल्याकडे येणारा ट्रेलर धडकल्याने ट्रक रस्त्यावर आला. त्याच वेळी अकोल्याहून अमरावतीकडे जाणारी बस (क्रमांक - एमएच 14 बीटी 0797) ट्रकवर धडकली. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. बोरगाव मंजू पोलिसांनी क्रेनने अपघातग्रस्त ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.