आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola In Patients Being Treated In The Hospital For Four Suspects

स्वाइन फ्लू आला.., वृद्ध, बालकांना अधिक धोका!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जगभरात २००९ मध्ये धुमाकूळ घालत भारतात अालेल्या स्वाइन फ्लू अर्थात इन्फ्ल्युएंझा ए. एच एन विषाणू आता डाॅक्टरांसारख्यांनाही जुमानत नसून, त्याचा धाेका अधिक वाढला अाहे. विशेषत बालक, ज्येष्ठांना त्याच्यापासून अधिक धाेका असून, त्याची काळजी घेण्याचे अावाहन तर करण्यात अालेले अाहेच, शिवाय खबरदारीही घेतली जात अाहे. त्यासाठी शाळांनाही सतर्क राहण्याचे अावाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यामध्ये सद्य:स्थितीत दोघे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, यापैकी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉ. सुरेंदर सिंह यांना उपचारासाठी अमरावतीला हलवण्यात आले आहे. सर्वोपचार रुग्णालयात चार संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ३१ जानेवारीपर्यंत २२ रुग्ण आढळले असल्याने राज्यात इन्फ्ल्युएंझा प्रतिबंध नियंत्रण उपाययोजना राबवण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातनंतर आता महाराष्ट्रातील नागपूर, अमरावती विभागात स्वाइन फ्लू या अाजाराने पाय पसरण्यास सुरुवात केली. त्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय नोडल अधिकारी म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक यांना प्राधिकृ़त केले आहे. सर्वेक्षणासाठी जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यात समन्वय ठेवण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी िदल्या आहेत. शासकीय प्रत्येक रुग्णालयात किमान रुग्णांवर उपचार करता येईल, असा स्वतंत्र अायसोलेशन कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. आवश्यक औषधे साधनसामग्री आवश्यकतेनुसार खरेदी करण्याच्या सूचनाही दिल्या.
कर्मचा-यांस प्रशिक्षण-
आरोग्यउपसंचालक डॉ. अविनाश लव्हाळे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांनी अधिनस्थ असलेले वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, अधिपरिचारिका यांना प्रशिक्षण दिले.
बालकांची घ्या विशेष काळजी
वर्गशिक्षकांनी विद्यार्थी फ्लूच्या लक्षणांनी ग्रस्त नाही ना याची खातरजमा करावी. यामध्ये सर्दीसह, अल्प ज्वर, अंगदुखी, घसा खवखवणे जुलाब यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. विद्यार्थी, शिक्षक आजारी असल्यास त्यांना सुटी देण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला.
अतिजोखमीच्या गटातील व्यक्ती
फुप्फुस,हृदय, मुत्रपिंड अथवा चेतासंस्थेचे जुनाट आजार असणाऱ्या तसेच रक्ताचे िवकार असणाऱ्या व्यक्ती या फ्लूच्या दृष्टीने अतिजोखमीच्या प्रवर्गात मोडतात. त्यामुळे असे आजार असणाऱ्या िवद्यार्थ्यांमध्ये कर्मचाऱ्यांमध्ये जर लक्षणे आढळली, तर त्यांना वैद्यकीय तज्ज्ञांकडून तत्काळ तपासून घ्यावे.
सर्वोपचार झाले मास्कमय
स्वाइनफ्लूच्या धोक्यामुळे खबरदारी म्हणून सर्वोपचार रुग्णालयातील प्रत्येक जण यामध्ये डॉक्टर, परिचारिका तसेच रुग्ण तोंडाला रुमाल किंवा मास्क लावून फिरत आहेत. यामुळे सर्वोपचारचा संपूर्ण परिसर मास्कमय झाल्याचे दिसून येते.