आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राणघातक हल्ल्यात नवविवाहित युवक जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जिल्हास्त्री रुग्णालयासमोरून घरी परतत असताना पाठीमागून येऊन हल्लेखोरांनी एका युवकावर प्राणघातक हल्ला केला. या वेळी युवकाच्या डोक्यावर फावडे मारल्याने युवक कोसळला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास घडली. देशमुखफैल येथील आनंदा चंद्रकांत गयले (वय २२) हा डॉ. केळकर यांच्याकडे पाच वर्षांपासून काम करतो. त्याचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. या दोघांनी प्रेमविवाह करण्याचे ठरवले. आज, या युवकाने अकोट येथील आर्य समाज मंदिरात विवाह उरकला उर्वरित.पान
होता.त्यानंतर तो दुपारी अकोल्याला आला होता. सायंकाळी त्याच्या काही नातेवाइकांना सोडण्यासाठी तो दुर्गा चौकाकडे गेला होता. पाहुण्यांना सोडून तो घरी परतत होता. जिल्हा स्त्री रुग्णालयासमोरून तो दुचाकीने परतत असताना त्याच्या मागून हल्लेखोर हातात फावडे घेऊन आला आणि त्याने अचानक आनंदावर हल्ला चढवला. या हल्ल्यात आनंदा रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनेची माहिती रामदासपेठ पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळावर रामदासपेठ पोलिस शहर पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे दाखल झाले होते.
घटनास्थळाची पाहणी करताना पोलिस.
हल्लेखोर गेले पळून
आनंदापाच वर्षांपासून केळकर यांच्या हॉस्पिटलमध्ये कामावर आहे. त्याचे कोणाशी वैर नसल्याची माहिती त्याच्या वडिलांनी दिली. पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. रात्री चंद्रकांत गयलेंच्या तक्रारीवरून रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.