अकोला- उद्योगाचा विकास, अकोला ते खंडवा रेल्वेचा विस्तार व महामार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी केंद्र शासन कटिबद्ध असून, अकोल्यातही ‘अच्छे दिन’येतील, अशी ग्वाही खासदार संजय धोत्रे यांनी दिली. अकोला इंडस्ट्रिज असोसिएशनची 27 वी वार्षिक आमसभा उद्योजक भवन येथे पार पडली. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष द्वारकादास चांडक, वरिष्ठ उपाध्यक्ष विष्णू खंडेलवाल, सचिव मनोज खंडेलवाल यांची उपस्थिती होती. या वेळी धोत्रे यांनी अकोला शहरात उद्योग येण्यास तयार असून, येथील मूलभूत सोयी-सुविधा वाढवण्याची गरज आहे.
या भागातील कृषी मालावर प्रक्रिया करणार्या उद्योगांमध्ये वाढ झाल्यास याचा थेट फायदा हा शेतकर्यांना होईल, असा विश्वास व्यक्त केला. या वेळी कैलाश खंडेलवाल, ऑइल मिल असोसिएशनतर्फे बसंत बाछुका, र्शीकांत पडगीलवार, दाल मिल असोसिएशनचे अनिल सुरेका, शैलेश खटोड, उन्मेष मालू, नितीन बियाणी, राजीव बजाज, अजय खंडेलवाल आदींची उपस्थिती होती. सुत्रसंचालन मनोज खंडेलवाल यांनी केले.
उद्योग इनोव्हेशन 2014 चे प्रकाशन :असोसिएशनची वार्षिक स्मरणिका ‘उद्योग इनोव्हेशन 2014’चे प्रकाशन झाले. या वेळी कृष्णाजी खटोड, राहुल मित्तल यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचे आभार मानले.